Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी?

Maharashtra Ladki Bahin Yojana New Income Criteria 2025: रक्षाबंधनाला लाडकीला गिफ्ट देणारं सरकार आता भाऊबीजेआधीच लाडकीवर रुसलयं... असं आम्ही का म्हणतोय? लाडकीच्या अडचणी पुन्हा का वाढलेत?
Government officials reviewing eKYC data as Bhau-Beej approaches, delaying Ladki Yojana payments.
Government officials reviewing eKYC data as Bhau-Beej approaches, delaying Ladki Yojana payments.Saam Tv
Published On

बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची ई-केवायसी बंधनकारक केलीय.. त्यातच ई-केवायसीच्या लांबलेल्या प्रोसेसेमुळे ऑक्टोबरचा हप्ताही लांबणीवर पडणार असून लाडकीला दिवाळीला भाऊबीज मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे....त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिलेली असताना विरोधकांनी पालिका निवडणुकांनंतर ही योजना बंद होईल,असे आरोप केलेत...

दरम्यान अजून एका नव्या निर्णयामुळे लाडकीच्या अडचणीत आणखी वाढ झालीय... अविवाहित लाडकीला वडिलांची तर विवाहित लाडकीला त्यांच्या पतीची देखील ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.. त्यात पती आणि वडीलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या लाडकीचा लाभ बंद होईल..

राज्य सरकार आता लाडक्या बहिणींची काटेकोरपणे छाननी करतयं... विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकषांकडे दूर्लक्ष करत काटेकोर छाननी न करताच लाडकीला सरसकट लाभ देण्यात आला होता... त्यामुळे आता योजनेचा आर्थिक भार पेलवत नसल्यानं सरकारनंही कठोर भूमिका घेतलीय..त्यामुळेच केवाय़सी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता हाती येणार नसल्यानं लाडक्या बहिणींना या दिवाळीत भाऊबीजेची सरकारी ओवाळणी मिळणं सध्या तरी कठीणचं दिसतंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com