Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य, कुठे अन् कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ladki Bahin Yojana E-KYC Step By Step Process: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. आता केवायसी कशी करायची याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

आता प्रत्येक लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य

ई-केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रोसेससाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करावी लागणार आहे.

ई-केवायसी प्रोसेस कशी करायची? (Ladki Bahin Yojana E KYC Step By Step Process)

तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करायची आहे. यासाठी काही कागदपत्रे, महत्त्वाची माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल. यासाठी वेबसाइटवर प्रोसेस सुरु झाली आहे.

तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन केवायसी करु शकतात.

केवायसीमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि माहिती टाकायची आहे.

तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड माहिती टाकायची आहे.

त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.

सध्या तरी वेबसाइटवर प्रोसेस सुरु झालेली दिसत नाहीये. मात्र, लवकरच ही प्रोसेस सुरु होईल आणि केवायसी कशी करायची याबाबत माहिती दिली जाईल.

लाडकी बहीण योजनेत दरवर्षी ई-केवायसी केली जाणार आहे. याबाबत मध्यंतरी माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, आता ही प्रोसेस सुरु झाली आहे. यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. तुम्ही दोन महिन्यात कधीही ई-केवायसी पूर्ण करु शकतात.

ई-केवायसी केले नाही तर... (Ladki Bahin Yojana KYC Process)

जर तुम्ही ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाडकी बहीण योजनेत जर केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य तेव्हा तुम्ही हे काम पूर्ण करा. ही संपूर्ण प्रोसेस कशी असणार याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये सोसायटी घोटाळा; कॉमन स्टिल्ट पार्किंग विक्री प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल

Kumbha Rashi : मित्र की गुप्त शत्रू? जाणून घ्या कुंभ राशीचे आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT