Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना KYC सक्तीची; कोणती कागदपत्रे लागणार? शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana EKYC Process And Required Documents: लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबाबत जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

ई-केवायसी करणे अनिवार्य

कोणती कागदपत्रे लागणार आणि प्रोसेस काय?

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana E kyc Last Date)

आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक महिलेला केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सर्व लाभार्थी महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे. यासाठीची प्रोसेस ऑनलाइन आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रोसेस पूर्ण करायची आहे.

ई केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojana E kyc online Process)

ई-केवायसीची प्रोसेस ऑनलाइन होणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही जी कागदपत्रे अर्ज करताना अपलोड केली होती तीच पुन्हा करावी लागणार आहेत. तिच माहिती पुन्हा भरावी लागणार आहे. याची प्रक्रिया सुरुदेखील झाली आहे.

ई केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? (Ladki Bahin Yojana E kyc Required Documents)

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहे. याचसोबत तुम्हाला नाव, वय, पत्ता अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे. अर्ज करताना तुम्ही जी कागदपत्रे अपलोड केली होती. तिच कागदपत्रे पुन्हा एकदा अपलोड करावी लागेल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होणार आहे.

ई-केवायसी न केल्यास काय होणार?

जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी केले नाही तर त्यांना फटका बसणार आहे. त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना दर महिन्याला मिळणार १५०० रुपये मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT