Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

Ladki Bahin Yojana December-January 3000 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. मंत्री गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार

४ दिवसात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आता दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत.लाडक्या बहि‍णींना पुढच्या चार दिवसातच पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत याआधीच नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता. परंतु तेव्हा फक्त १५०० रुपये जमा झाले. त्यानंतर महिलांच्या मनात निराशा होती. त्यानंतर आता मात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये येणार आहेत.

मंत्री गिरीश महाजनांची माहिती (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Come Together)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विट करत माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्रांतीची मोठी भेट !१४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३००० रुपये जमा होणार !, असं म्हटलं आहे. याचसोबत एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. ज्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहि‍णींना मकर संक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाची माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळणार आहे.

लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला गिफ्ट (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Come on Makar Sankranti)

लाडकी बहीण योजनेत मागच्या महिन्यात फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला होता. महिलांना मात्र ३००० रुपये येतील, अशी आशा होती. त्याचसोबत हप्तादेखील लांबणीवर जात असल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे. परंतु आता महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT