Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Nashik Womens Viral Video : नाशिकमध्ये प्रचारात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पैसे न दिल्याने महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी
Nashik Womens Viral VideoSaam Tv
Published On
Summary
  • नाशिक अंबड येथे ८५ महिला प्रचारकांमध्ये मजुरी न मिळाल्याने हाणामारी

  • प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जास्त मजुरीच्या आमिषामुळे वाद विकोपाला

  • महिलांचे ३० हजार रुपयांचे नुकसान

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्याने पक्षातील नेते कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. अनेक राजकीय पक्ष पुरूषांसोबतच महिलांना रोजंदारी देऊन प्रचारात सहभागी करून घेतात. सामान्यतः या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये एवढी मजुरी दिली जाते. अशाच एका प्रचारादरम्यान महिलांमध्ये पैसे न दिल्याच्या रागातून तुफान हाणामारी झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. सदर घटना ही नाशिक मधील असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील हा सर्व प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर घडला. तब्बल ८५ महिला सकाळपासून प्रचार करत होत्या. दिवसभर त्या बसून राहिल्या, प्रचाराच्या कामात सहभागी झाल्या. मात्र, संध्याकाळी पैसे मिळण्याची वाट पाहताना त्यांना कोणतीही रक्कम देण्यात आली नाही.

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

याच दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवले आणि चालू प्रचार सोडून त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. या गोंधळात महिलांनी एकमेकींना दोष देणे सुरू केले आणि वाद हाणामारीपर्यंत पोचला.या प्रकरणात जवळपास ८५ महिलांचे तब्बल तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. संतापलेल्या महिलांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेली घटना पोलीसांना सांगितली.

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी
Crime News : भयंकर! आईचं काकासोबत लफडं, मुलाने दोघांना एकत्र पाहिलं; वडिलांना सांगण्याआधीच त्याला संपवलं

मात्र, महिलांनी एकमेकींविरोधात कोणतीही लेखी तक्रार दिली नाही. यामुळे पोलिसांसमोर कारवाईचा मोठा पेच निर्माण झाला आहे. कोणत्याही बाजूने फिर्याद नसल्याने पोलिस फक्त समजूत घालून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी प्रचारासाठी अनेक महिला प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com