Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना डिसेंबरचे ₹१५०० कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana November-December Installment: लाडकी बहीण योजनेत अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. दरम्यान, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

अजूनही नोव्हेंबरच्या हप्त्याची घोषणा नाही

निवडणूकीनंतर येऊ शकतो डिसेंबरचा हप्ता

नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर सुरु झाला आहे. दरम्यान, अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे. परंतु डिसेंबरचा हप्ता तर याच महिन्यात येणार का असा संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

डिसेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana December Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. डिसेंबरचा हप्ता कदाचित नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर येऊ शकतो. याबाबत आदिती तटकरे लवकरच माहिती देतील.

लाडक्या बहि‍णींना केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. जर तुम्ही त्याआधी केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यापुढचे हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ऑनलइन पद्धतीने केवायसी करावे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. परंतु आता ही योजना बंद होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. काल रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : खोटे शिक्के घेतले, कागदपत्रे तयार केली; पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला बेड्या

Tulsi Leaves Face Pack: थंडीत मऊ आणि चमकदार त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा फेसपॅक कसा बनवायचा?

Dhurandhar Collection : बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा बोलबाला; 'धुरंधर'नं पहिल्याच दिवशी 'सैयारा', 'पद्मावत'ला पछाडलं, कमाई किती?

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० प्रेरणादायी विचार

Dr Babasaheb Aambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वीच्या २४ तासांत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT