Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा, या महिलांना ₹१५०० मिळालेच नाहीत; कारण काय?

Ladki Bahin Yojana These Women will not Get December Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, काही महिलांना डिसेंबरचे १५०० रुपये मिळाले नाहीत.

Siddhi Hande

लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा

अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा नाही

पैसे न येण्यामागची कारणे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. परंतु सरसकट सर्व महिलांना पैसे मिळाले नाहीत. काही लाडक्या बहि‍णींना डिसेंबरचे १५०० रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. डिसेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे का मिळाले नाही यामागे अनेक कारणे असू शकतात.

या लाडक्या बहि‍णींना मिळाले नाहीत ₹१५००

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नाही, असं सांगितलं होतं. दरम्यान, आता ज्या महिलांनी केवायसी केली नाही अशा काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. नवीन आर्थिक वर्षापासून केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, असं सांगितलं होतं. मात्र, आतापासून पैसे मिळत नसल्याने महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता न मिळण्यामागचे कारण (Ladki Bahin Yojana These Women will not get benefit Know the reason)

लाडकी बहीण योजनेत केवायसी केलेल्या महिलांमध्येही ज्या निकषामध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला आहे. याचसोबत ज्या महिला वयोमर्यादेत बसत नाही त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे काही महिलांना १५०० रुपये मिळाले आहेत तर काही महिलांना पैसे मिळाले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT