Ladki Bahin August Installment AI Image
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला, ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Ladki Bahin August Installment : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. १९ सप्टेंबरनंतर १,५०० रुपयांचा हप्ता टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतायेत.सप्टेंबर महिना सुरू होऊन पहिला आठवडा संपला तरी ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे कधी येणार?

दरम्यान, येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा सन्माननिधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. मात्र, याबद्दल राज्य सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ही तारीख सध्या संभाव्य मानली जात आहे.

किती पात्र महिलांना मिळणार लाभ?

येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होईल. सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहि‍णींना आर्थिक मदत देण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. योजनेतल्या पात्र महिलांना हा निधी थेट DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेचा लाभ १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. ऑगस्टच्या हप्त्यासाठी महत्त्वाच्या निधीला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचीही माहिती समोर आली आहे.

कोणत्या महिलांचा हप्ता रखडणार?

दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपलं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही आणि DBT अॅक्टिव्ह आहे की नाही, याची खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून हप्ता वितरित झाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा होण्यास अडथळा येणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना असून, २१ ते ६५ वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता ऑगस्टचा हप्ता १६ सप्टेंबरनंतर कधी आणि किती टप्प्यांत जमा होतो, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT