Sakshi Sunil Jadhav
WhatsAppने भारतात बिल पमेंटेस फिचर आणले आहे. त्यामुळे आता वीज, पाणी, गॅससह अनेक बिलं थेट WhatsAppवरून भरता येणार आहेत.
बिल भरण्यासाठी वेगळं अॅप उघडण्याची गरज राहणार नाही. व्हॉट्सअॅपच्या होम स्क्रीनवरील संबंधित पर्यायातून ही सुविधा वापरता येईल.
वीज, पाणी, गॅस, फास्ट टॅग, विमा, क्रेडिट कार्ड आणि लोनच्या हप्त्यांसह तब्बल ३० कॅटेगिरींमध्ये पेमेंट करता येणार आहे.
बिल भरण्यासाठी यूझर्सना UPI, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे पर्याय मिळतील. त्यामुळे पेमेंट करण्याची प्रोसेस जास्त सोपी होणार आहे.
युझर्सना आधी भरलेल्या बिलांची माहिती पाहता येईल. तसेच येणारी बिलं ट्रॅक करण्याची आणि पेमेंटचा रेकॉर्ड ठेवण्याची सुविधाही मिळणार आहे.
सतत बिल भरणाऱ्या बिलर्सना सेव्ह करता येणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी बिल भरताना पुन्हा शोधण्याचा त्रास कमी होईल.
एका बिलरअंतर्गत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील, तरी ती व्हॉट्सअॅपवरून मॅनेज करता येणार आहेत. यामुळे नियमित बिल भरणाऱ्या युझर्सना मोठी सोय होईल.
WhatsApp चे हे फीचर सध्या Android आणि iPhone युझर्सना टप्प्याटप्प्याने दिलं जात आहे. येत्या काही आठवड्यात जास्त युझर्सना ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.