Ladki Bahin Yojana August installment Rs 1500 payment update : राज्यातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांची ही वाट आता संपली आहे. पुढील अवघ्या काही तासांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये १५०० रूपयांचा सन्मान निधी जमा होण्यास सुरूवात होणार आहे.
शासनाकडून ३३९ कोटींचा निधी वितरित
राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ पात्र महिलांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून सहसा अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांच्या कल्याणासाठी, शिष्यवृत्तीसाठी आणि विविध विकास योजनांसाठी हा निधी राखीव ठेवला जातो. मात्र, योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन यातील ३३९ कोटी रुपयांचा निधी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित (वर्ग) करण्यात आला आहे.
१ कोटी ६६ लाख महिलांना होणार फायदा
या निर्णयामुळे राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जाणार आहेत. ही रक्कम थेट बँक खात्यात (DBT द्वारे) ट्रान्सफर होणार असल्याने प्रक्रियेला गती मिळाली आहे. येत्या काही तासांतच बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश (SMS) महिलांच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल.
इतर विभागांच्या निधीचा वापर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा मोठा आर्थिक विस्तार आणि भार लक्षात घेता, राज्य सरकार विविध विभागांमधील संबंधित घटकांसाठीच्या अर्थसंकल्पित तरतुदींचा वापर या योजनेचे हप्ते वेळेवर देण्यासाठी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.