Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Majhi Ladki Bahin Yojana September Month Installment Update: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. दरम्यान, महिन्याअखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार?

या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली आहे. या योजनेत आतापर्यंत १४ हप्ते जमा झाले आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरु झाली होती. दरम्यान, ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana September Installment Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला आहे. त्यामुळे सप्टेंबरचे १५०० रुपयेदेखील येण्यास उशिर होणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सप्टेंबर महिन्यात ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यामुळे कदाचित सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. कदाचित पुढच्या महिन्यातदेखील पैसे जमा केले जाऊ शकतात. मागच्या अनेक महिन्यापासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा होतात. त्यामुळे या महिन्यातदेखील या दिवशी पैसे येतील, अशी अपेक्षा महिलांची आहे.

लाखो बोगस महिलांनी लाटले सरकारचे पैसे

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतला आहे. २६ लाखांपेक्षा अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, त्यानंतर आता काही महिलांनी अर्ज करताना जे पत्ते दिले आहेत ते खोटे असल्याचे समोर आले आहे. अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी भेट दिल्या महिला सापडल्याच नाहीत. त्यामुळे महिलांनी सरकारची फसवणूक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

SCROLL FOR NEXT