Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ऑगस्टचे ₹१५०० खात्यात जमा होण्यास सुरूवात, लाडक्या बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

Majhi Ladki Bahin Yojana August Installment Recieve Or Not: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अशा पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले की नाही?

१५०० रुपय जमा झाले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचा हप्ता थोडा उशिरा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, काही महिलांच्या खात्यात पैसे जमादेखील झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली असून याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) काल ट्विट करत ऑगस्टचा हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिलांना प्रत्येकी १५०० रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करा.

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही? (Ladki Bahin Yojana 1500 Rupees Recieve or Not)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन बघा की तुम्हाला पैसे आलेत की नाही. याचसोबत तुम्हाला पैसे आलेत की नाही याचा मेसेज येईल. त्यावरुनदेखील तुमच्या लक्षात येईल, पैसे आलेत की नाही.

तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील तुमचा बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. यातदेखील शेवटच्या ट्रान्झॅक्शनची माहिती मिळेल. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले की नाही आणि खात्यात एकूण किती पैसे आहेत याची माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांचे उपोषणस्थळ आणि परिसरात श्वान पथककडून पाहणी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणार का? भाजपच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढचे 2 महिने ठरणार गेमचेंजर, DA 63% होणार?

एकनाथ शिंदे आता भाजपला टशन देणार, उत्तर भारताच्या मैदानात शिलेदार उतरवणार, नेत्यांना दिला कानमंत्र

SCROLL FOR NEXT