Augest installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

Ladki Bahin Yojana Augest Installment: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा होणार आहेत. त्यांनी आजच खात्यात पैसे आले की नाही हे चक करावे.

Priya More
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी गुड न्यूज

  • लाडकींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळणार

  • लाडकींच्या खात्यात आज १५०० रुपये जमा होणार

  • लाडकींच्या मोबाईलवर आज पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी मिळणार याची वाट होत्या त्यांची ही प्रतीक्षा आज संपणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात होणार आहे. फडणवीस सरकारकडू लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये देण्यासाठी निधी हस्तांतरीत करण्यात आला होता. दोन दिवसांत लाडकींच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा होतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आजपासून लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आज आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला की नाही हे चेक करावे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे. सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. त्यामुळे पात्र बहिणीच्या बँक खात्यात आजपासून १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने ३३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी केला होता त्यामुळे लाडकींना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकला झाला होता.

फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यापर्यंतच्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते. लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होते. आता त्यांच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा केले जाणार आहेत. आता त्या सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारत आहेत.

महाराष्ट्र सरकार नेहमी सणाचे औचित्य साधून लाडकींच्या खात्यावर पैसे जमा करत आले आहे. त्यामुळे यंदा देखील गणेशोत्सवाचे औचित्य साधत सरकार खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे पैसे एकत्रित जमा करेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती. पण आता सरकार फक्त ऑगस्ट महिन्याचेच १५०० रुपये देणार आहे. आज लाडकींच्या खात्यात रक्कम जमा होईल. लाडक्या बहिणींना जर आपल्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही तर त्यांनी थेट बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून विचारणा करावी. नाही तर बँकेत जाऊन एकदा खात्यात पैसे आले की नाही ते तपासावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT