Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीला ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? ₹३००० रुपयांची घोषणा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana August And September Installment: लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार

लवकरच घोषणा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. तरीही अजून मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे या महिन्यात दोन महिन्याचे ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबत घोषणा केली जाते. दरम्यान, अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ हप्ते जमा केले जाणार आहेत.परंतु हे हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये येणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत आदिती तटकरे घोषणा करतील.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी करत आहेत. यातील ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही. त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. त्यांच्या घरोघरी जाऊ त्यांच्या उत्पन्नाची, त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाते. त्यातून ज्या महिला निकषात बसत नाही त्यांना पुढच्या महिन्यापासून १५०० रुपये मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत २६ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: '...तर दोन-चार मंत्र्यांना कापा', रविकांत तुपकरांचं खळबळजनक विधान

Phaltan Doctor Death: अखेरच्या सेल्फीमधून धक्कादायक खुलासा; आत्महत्येआधी डॉक्टर तरुणीची दोघांपैकी एकाशी चॅटिंग

IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

Pune: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई, IT इंजिनिअरला अटक; दहशतवाद्यांशी कनेक्शन?

Maharashtra Live News Update: पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत: पोलीस मदतीला सरसावले

SCROLL FOR NEXT