Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का? काय सांगतात नियम, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Application Still Going on: लाडकी बहीण योजनेत अजूनही अर्ज करता येणार का असा प्रश्न अनेकजण विचारत आहे. दरम्यान,सध्या तरी या योजनेत तुम्ही अर्ज करु शकत नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) पात्र असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लाभार्थी असूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता अर्ज करता येत नाहीये. त्यामुळे नव्याने सहभागी होण्याच्या तयारीत असणाऱ्या महिला या लाडक्या बहिणी नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का? (Ladki Bahin Yojana Application Status)

लाडकी बहीण योजना जून २०२४ मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल बंद करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येत होता. त्यामुळे आता या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

या योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे, असं महिलांचे म्हणणे आहे. तसेच अनेक महिलांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने योजनेअंतर्गत पैसे जमा होत नाही. त्यामुळे अर्जामधील दुरुस्तीसाठी पोर्टल सुरु करणे आवश्यक आहे. याचसोबत नव्याने २१ वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळायला हवा, त्यामुळे पोर्टल सुरु करण्यास साांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेची पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. तसेच महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : "हनुमान चालीसा म्हटली अन्.." फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार पीएम मोदींशी संवाद साधताना झाले भावुक; पाहा Video

Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Rajgira Laddu Recipe : नवरात्रीत उपवासाला खा टेस्टी राजगिरा लाडू; प्रोटीनसह मिळेल दिवसभराची एनर्जी, रेसिपी १० मिनिटांत तयार

Maharashtra News Live Update: मंगळवेढ्यात दुष्काळाची दाहकता; आमदार समाधान आवताडेंकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी

Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

SCROLL FOR NEXT