Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: चक्क ९८ वर्षांच्या आजीबाईंनी घेतला 'लाडकी'चा लाभ, वर्षभरात लाटले १८ हजार रूपये, धक्कादायक माहिती उघड

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या योजनेत ८५,९० आणि ९७ वर्षीय आजीने लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच निकषांबाहेर जाऊन अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. अनेक महिला वयोमर्यादेत न बसतानाही त्यांनी अर्ज केले आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी ८५,९० आणि ९७ वर्षांच्या आजीबाईंनीदेखील योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जवळपास २६ लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.या योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे जितक्या जास्त महिलांनी लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. यासाठी पडताळणी सुरु आहे. परंतु या योजनेत काही आजीबाईंनीदेखील योजनेचा लाभ घेतला आहे.

९०,९८ वर्षाच्या आजीबाईंनी योजनेचा लाभ घेतला आहे. तरीही पडताळणीच्या वेळी या आजीचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यानंतर कोणत्याही कागदपत्राशिवाय तोंडी माहितीच्या आधारे पडताळणी केली जाणार का, या महिलांचे अर्ज बाद केले जाणार की नाही याची काळजी आता महिलांना लागली आहे.

जर एका कुटुंबात २ पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला तर...

जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला तर त्यातील फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा हे स्वतः महिलेने लेखी लिहून द्यायचे आहे.मात्र, असे लिहून देण्यास सर्वांनी नकार दिला आहे, असं अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

SCROLL FOR NEXT