Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ८६ लाख लाडक्या बहिणींना मिळाला नाही जानेवारीचा हप्ता; ₹१५०० न येण्यामागचं कारण काय?

Ladki Bahin Yojana 86 Lakh Women Not Get January Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा करण्यात आला आहे. जवळपास ८६ लाख महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही यामागचे कारण काय ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

८६ लाख महिलांनी जानेवारीचा हप्ता नाही

कारण काय? वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ मिळाला नाही. तुम्हाला पैसे आले की नाही हे जाणून घ्या.

८६ लाख महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेत ८६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान, जवळपास लाखो महिलांनी केवायसी केले नाही. याचसोबत अनेक महिलांनी केवायसीमध्ये चुका केल्या आहेत. त्यांनाही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे बंधनकारक होते. एकूण २ कोटी ४० लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील १ लाख ६० हजार महिलांना हप्ता मिळाला आहे. जवळपास ८६ लाख महिलांचा हप्ता थांबला आहे.यातील अनेक महिलांनी केवायसी केले नाही तर अनेक महिलांनी चुकीची माहिती दिल्याने जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत आता राहिलेल्या महिलांनी केवायसीमध्ये दुरुस्ती करायची आहे. दुरुस्ती केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ पुन्हा सुरु होणार आहे. रखडलेले हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. एप्रिल महिन्यापासून महिलांना सर्व रखडलेले हप्ते एकत्र मिळू शकतात. चार महिन्याचे पैसे महिलांना एकत्र मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

Eyebrow : आयब्रो केल्यानंतर स्किनवर छोटे लाल दाणे दिसतात? तर करा हे उपाय

Belapur Tourism : पावसाळ्यात फिरण्याची हौस असेल तर बेलापूरजवळची 'ही' ५ ठिकाणं मिस करू नका!

SCROLL FOR NEXT