Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ७.५ लाख महिलांचे अर्ज बाद; कारण काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana 1.5 Lakh Women Application Rejected: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. मात्र, केवायसी करताना लाखो महिलांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले.

Siddhi Hande

अपात्र महिलांनी लाटले लाडकी बहीण योजनेचे पैसे

७.५ लाख महिलांचे अर्ज बाद

वयोमर्यादेत आणि उत्पन्नाच्या निकषात बसत नाही

सरकारी कर्मचाऱ्यांनीही घेतला योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास अनिवार्य केले आहे. दरम्यान, या केवायसीमुळे मात्र अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेतून आता लाखो महिलांना वगळण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत या महिलांना निकषाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर आता त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

साडेसात लाख महिलांचा लाभ बंद (Ladki Bahin Yojana 7.5 Lakh Women Application Rejected)

लाडकी बहीण योजनेतून दीड लाख महिलांना वगळण्यात आले आहे. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये अनेकांनी उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखांपेक्षा जास्त असतानाही लाभ घेतला आहे. तर अनेकांना वयोमर्यादेत बसत नसताना योजनेअंतर्गत पैसे लाटले आहेत.

५ लाख महिलांचे उत्पन्न जास्त (5 Lakh Women Application Rejected)

लाडकी बहीण योजनेत ५ लाख महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लिहले होते ती, २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही. परंतु तरीही महिलांना पैसे लाटले आहेत. आता या सर्व महिलांना बाद केले जाणार आहे.

दीड लाख महिलांनी लाटले लाडकीचे पैसे

२१ ते ६५ वयोगटातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, यामध्येही दीड लाख महिला वयोमर्यादेत बसत नसतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे. दर महिन्याला १०-१२ लाख महिला योजनेतून बाद होत आहेत. यासाठी केवायसी करताना सॉफ्टवेअरमध्ये तशी रचना करण्यात आली आहे. यामुळे जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला योजनेतून वगळले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT