Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ६१ हजार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट नाही,₹१५०० जमा झालेच नाही; कारण काय?

Ladki Bahin Yojana 61000 Women Not Get 1500 Rupees: लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधनला जुलैचा हप्ता जमा झाला आहे. अमरावीतीमधील ६१ हजार महिलांना जुलै महिन्याला लाभ मिळाला नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद

अमरावतीमधील ६१ हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही

निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ मिळाला नाही

लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत.अमरावतीत जवळपास ६१ हजार लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट मिळाली नाही. त्यामुळे काही लाडक्या बहि‍णींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

लाडक्या बहिणींना मिळाला नाही जुलैचा लाभ (These Women Not Get July Month Benefit)

एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लाडक्या बहि‍णींना फटका बसणार आहे. वयोमर्यादेतदेखील न बसणाऱ्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळाला नाही. अमरावती जिल्ह्यात जवळपास एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांची संख्या ४८ हजार झाले आहेत.

अमरावतीसह अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. रक्षाबंधनाची भेट हजारो लाडक्या बहि‍णींना मिळाली नाही. दरम्यान, अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यातून अजून महिला बाद होण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. यातून ज्या महिला निकषांबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असेल. २१ ते ६५ वयोगटातील उमेदवारांना योजनेचा लाभ मिळतो. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.महिला सरकारी कर्मचारी नसावे. पेन्शन घेणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT