Ladki Bahin Yojana Updates Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवळणी; महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana 4th Installment: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेत आता चौथा हप्ता जमा करण्यात आला आहे.

Siddhi Hande

Ladki Bahin Yojana Updates: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. वर्षाला १८००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत महिलांच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते जमा झाले आहे. त्यानंतर आता चौथा हप्तादेखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना तीन हप्त्याचे ४५०० रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर आता महिलांना ३००० रुपये देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौथा आणि पाचवा हप्ता अॅडव्हान्समध्ये देण्यात आला आहे.(Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच ३००० रुपये महिलांच्या अकाउंटला पाठवण्यास सुरुवात झाली आहे.१० ऑक्टोबरपूर्वी महिलांना हे पैसे देण्यात येत आहे.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा हप्ता आल्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिवाळीपू्र्वीच भाऊबीजेची ओवाळणी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही

जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन करुन घ्या. त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर पैसे आलेत की ते चेक करु शकतात. तसेच तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जाऊन पैसे आलेत की याबाबत माहिती मिळवू शकतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो. (Ladki Bahin Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT