Ladki Bahin Yojana Saam Tv News
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील ४८३० लाडक्या बहिणी अपात्र; पडताळणीतून धक्कादायक माहिती समोर; तुमचं नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana 4830 Women Ineligible: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे. या पडताळणीतून हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. अजूनही काही महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेत दोन टप्प्यांमध्ये महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लातूरमधील ४ हजार ८३० महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामागे अनेक कारणे आहेत. काही महिलांनी वयोमर्यादेत बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे तर एकाच कुटुंबातील तिघी-चौघींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

विधानसभेच्या तोंडावर शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. महिलांना आत्मनिर्भर आणि स्वालंबी बनवण्यासाठी ही योजना आणल्याचं सांगितलं गेलं. मात्र सुरुवातीला या योजने त कुठलेही निकष न पाहता अनेक लाडक्या बहिणींना प्रति महिना दीड हजार रुपयाचा हप्ता देण्यास सुरुवात झाली. दरम्यान आता या योजनेतून मोठ्या संख्येने नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे नावे वगळायला सुरुवात केली आहे.

लातूरमधील महिला अपात्र

लातूर जिल्ह्यातदेखील दुसऱ्या टप्प्यात 4 हजार 830 लाडक्या बहिणींचे नाव कमी करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये, एकाच कुटुंबात तिघी चौघी महिलांनी लाभ घेतला, तर २१ पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आले आहे. या महिलांना अपात्र करत योजनेचा लाभ थांबवण्यात आलाय.

निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ

वयामुळे अपात्र झालेल्या लातूर जिल्ह्यात 1 हजार 16 लाडक्या बहिणींची नाव कमी करण्यात आलेत. तर एकाच कुटुंबातील तर दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या महिलांची संख्या 3 हजार 211 इतकी आहे . अशा अपात्र लाडक्या बहिणींची नाव कमी करण्यात आले आहेत. दरम्यान निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी पुढे देखील सुरूच राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team Indiaला मोठा धक्का! पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी स्टार खेळाडूला गंभीर दुखापत, सूर्याचं टेन्शन वाढलं

GK: सूर्यदेवाच्या रथावर सात घोडे का बांधलेले आहेत? जाणून घ्या महत्त्व

Shivali Parab: नथीचा नखरा अन् केसात माळलाय गजरा; शिवालीचं पारंपारिक सौंदर्य पाहून जीव जडेल

Maharashtra Live News Update: - ईश्वरपूरमध्ये पोलीस आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरमधून मोठी गळती, आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT