Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी, २७ लाख 'लाडकी'ची आजपासून पडताळणी,अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार!

Majhi Ladki Bahin Yojana Verification Start From Today: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जवळपास २७ लाख महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र

२६ लाख ४४ हजार महिलांच्या घरी जाऊन पडताळणी होणार

अंगणवाडी सेविकांकडून होणार छाननी

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. यासाठी आता घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे. यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.

आजपासून पडताळणी सुरु (Ladki Bahin Yojana Verification Start From Today)

लाडकी बहीण योजनेत २६ लाख ३४ हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली आहे. आता या सर्वांच्या याद्यांमधील महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यास या याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत २ कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यासाठी निधीदेखील वर्ग करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची पडताळणी सुरु केली. त्यातूनही अनेक महिला बाद झाल्या. परंतु आता पुन्हा २६ लाख ४४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे.

या महिलांचे लाभ बंद होणार

या योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतले आहेत त्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यात जर महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या पुरुष लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावरदेखील कारवाई होणार आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार आहेत. जवळपास २६ लाख ३४ हजार महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असल्याचे समजत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी लाभ घ्यावा. तरीदेखील २१ पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनी लाभ घेतला आहे. सोलापूरातील २६ हजार ७८ महिलांनी वयोमर्यादेत नसतानाही लाभ घेतला. तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्यांची संख्या ८३ हजार ७२२ आहे.या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाईल, असं रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या?

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत एकूण ४२ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

किती महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार?

लाडकी बहीण योजनेतील २६ लाख ४४ हजार महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. या महिलांची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली होती.

अपात्र महिलांची पडताळणी कशी होणार?

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका ही छाननी करणार आहेत.

लाडकी बहीण योजना कधीपासून सुरु झाली?

लाडकी बहीण योजना जून २०२४ मध्ये सुरु झाली. ही योजना सुरु होऊन वर्ष झाले आहे.

लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT