Ladki Bahin Yojana Saam Tv News
बिझनेस

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून २६ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. या योजनेतून आता अपात्र महिलांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल २६ लाख महिलांना अपात्र केले असल्याचे माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले होते की, २६ लाख ३४ हजार महिला विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत. याचसोबत १४२९८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता या अपात्र महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

अपात्र बहि‍णींवर कारवाई होणार (Action Taken On Ladki Bahin Yojana Ineligible Women)

लाडकी बहीण योजनेत जवळपास २६ लाख महिलांना निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, या महिलांनी महिन्याकाठी १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

या योजनेत १४२९८ पुरुषांनीही १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. या योजनेत त्यांनी जवळपास १० महिने लाभ घेतला आहे. या पुरुषांनी जवळपास २७ कोटी रुपयांची लूट केल्याचा अंदाज आहे. या पुरुषांवर कारवाई करु, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले? (Ajit Pawar on Ladki Bahin Yojana)

गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून ही योजना सुरु केली. ही योजना पुरुषांसाठी नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करु. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असं अजित पवारांनी सांगितले आहे. दरम्यान, जसं ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ज्या अपात्र महिलांनी लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई होणार का याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत किती महिला अपात्र ठरल्या आहेत?


सुमारे २६ लाख ३४ हजार महिलांना विविध कारणांनी अपात्र ठरवले आहे.

किती पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला?

होय, १४२९८ पुरुषांनी या योजनेचा गैरवापर करून दरमहा १५०० रुपये घेतले आहेत.

अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार का?

अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार की नाही याबाबत अधिकृत माहिती नाही, पण प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BitChatApp: व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आला नवीन अ‍ॅप, हा मेसेजिंग अ‍ॅप इंटरनेटशिवाय करेल काम

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं

MNS on Kalyan Game Zone : शाळा बुडवून गेम झोनमध्ये विद्यार्थी! मनसे आक्रमक | VIDEO

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, एन्काउंटरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

Maharashtra Live News Update: वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा

SCROLL FOR NEXT