LADKI BAHIN SCHEME BIG UPDATE 67 LAKH WOMEN REMOVED AFTER E-KYC DEADLINE Saam Tv
बिझनेस

लाडक्या बहिणींना फटका, 67 लाख महिलांचे अर्ज बाद, मिळणार नाही 1500, तुमचं तर नाव नाही ना?

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न केल्याने 67 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. 1500 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार नाही? सविस्तर माहिती वाचा.

Omkar Sonawane

ई-केवायसी न केल्याने 67 लाख महिलांचा लाभ थांबला

एकूण 2.47 कोटी महिलांनी अर्ज केले होते

फक्त 1.80 कोटी महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली

31 डिसेंबरनंतर पोर्टलवरील ई-केवायसी सुविधा बंद

सध्या तरी सरकारकडून कोणतीही सवलत किंवा मुदतवाढ नाही

राज्य सरकारची अशी योजना ज्या योजनेने महाराष्ट्राच्या घराघरात नाव कोरले आहे. इतर राज्यात देखील या योजनेने भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. दरमहिन्याला 1500 रुपये येण्याची वाट ही सर्वच महिला पाहत असतात. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव या योजनेतून अनेक महिलांचे नावे ही वगळण्यात आल्याचे दिसून आले.

मात्र 2026 या नवीन वर्षालाच लाडक्या बहीणींना मोठा दणका बसला आहे. 31 डिसेंबर 2025 ही ई-केवायसी E-KYC करण्याची अंतिम तारीख होती आणि ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांची नावे या यादीतून वगळण्यात आले असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारने या योजनेमध्ये परदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त गरजू महिलांनायाचा फायदा मिळावा यासाठी ई केवायसी सक्तीची केली होती. मात्र वेळोवेळी सांगून देखील लाखो महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाहीये.

वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ईकेवायसी न केलेल्या लाडकी बहीण योजनेतून तब्बल 67 लाख महिलांचे नाव वगळण्यात आल्याने महिलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील या योजनेसाठी एकूण 2 कोटी 47 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, प्रशासकीय पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते.

उपलब्ध आकडेवारीनुसार, केवळ 1 कोटी 80 लाख महिलांनीच दिलेल्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. परिणामी, तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे तब्बल 67 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर पोर्टलवरील ई-केवायसीची सुविधा बंद करण्यात आली असून, सध्या तरी मुदतवाढीबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT