Why Has Your Ladki Bahin ₹1500 Installment Stopped? Check the Reason at Your Taluka Office google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद का झाले? या ठिकाणी कळणार कारणं, फक्त १ गोष्ट करावी लागेल

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद का झाले? हा प्रश्न राज्यातल्या लाखो महिलांना पडला आहे. पुढील माहितीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Sakshi Sunil Jadhav

राज्यभरातल्या आत्तापर्यंत लाखो पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणींचा लाभ घेता आला आहे. ई-केवायसी प्रोसेसनंतर जवळपास ७० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. ज्या महिला पात्र होत्या त्यांनाच या योजनेचा लाभ म्हणजेच दरमहा १५०० रुपयांचा हप्ता मिळाला आहे. पण ज्या महिला अपात्र ठरल्या किंवा ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही याचं कारण कुठे शोधायचं? हे पुढील माहितीत सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त १ गोष्ट करावी लागेल.

लाडक्या बहिणींचा लाभ आत्तापर्यंत राज्यातला अनेक गरजू महिलांनी घेतला आहे. ई-केवायसी प्रोसेसनंतर अपात्र महिलांना यातून वगळण्यात आलं. या महिलांना का पैसे आले नाहीत किंवा त्यांचा हप्ता का बंद झाला याचं कारण तुम्हाला शोधता येऊ शकतं. यापुर्वी तुम्ही याचा तपास करण्यासाठी जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जात असाल. पण यासाठी लाडकीला खूप लांबचा प्रवास करावा लागत होता. मात्र तुम्हाला आता याची गरज लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी एक गोष्ट करावी लागेल. ती माहिती पुढील प्रमाणे आहे.

जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जाण्याऐवजी तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयातही चौकशी करू शकता. त्यामुळे महिलांना शेकडो किलोमीटरहून सोलापूरात येण्याऐवजी तालुक्यातील कार्यालयात जावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्यातल्या बालविकास प्रकल्प कार्यालयात लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल चौकशी करू शकता.

सध्या जवळपास ७० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला आहे. महिला याच्याच चौकशीसाठी दररोज कार्यालयात भेट देत आहेत. तिथे महिलांना हप्ता न मिळाल्याचे कारण आणि चूका सांगितल्या जात आहेत. तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेसची मुदत ही ३० एप्रिलला संपली. काही महिलांनी या मुदतीत ही प्रोसेस केली नाही. याचा आकडा मोठा आहे. त्यासंदर्भात पत्रव्यवहार शासन स्तरावर केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : दिलासादायक! मॉन्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, २६ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट'

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी जिमची काय गरज? फक्त रोज सकाळी प्या हा खास चाहा

Pune : वळणावळणाचे घाट अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, रोड ट्रिप प्रेमींसाठी 'हे' ठिकाण जणू स्वर्गच

Accident : ट्रकला मिनी बसची जोरात धडक, भीषण अपघातात ७ भारतीयांचा मृत्यू

Deool Band 2 Collection : श्री स्वामी समर्थ! प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'देऊळ बंद २' नं केली बक्कळ कमाई, कलेक्शन एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT