Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला होणार जमा

Siddhi Hande

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता महिला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे आहे. महिलांना आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत.

ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा झाले आहे. त्यांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे. त्यांना तीन महिन्याचे ४५०० रुपये मिळणार आहे. हा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana)

या तारखेला येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचे पैसे

मीडिया रिपोर्टनुसार, १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार शकतात. याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT