Ladki Bahin Yojana representative image
बिझनेस

Ladki Bahin Yojana:12 लाख नव्या 'लाडकीं बहिणींना हफ्ता मिळणार, आधार लिंक असेल तर मिळेल लाभ

Ladki Bahin Yojana Installment: महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय आणि आपलं आधार कार्ड बँक खाते आणि अर्जांसोबत जोडलंय त्यांना १५०० रुपये मिळणार आहेत.

Girish Nikam

लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या लाडकींनाही दिलासा मिळाला आहे. ज्यांची आधार जोडणी पूर्ण झाली आहे. अशा 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हफ्ता मिळणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेवर आलंय. सत्ताधारी नेतेही उघडपणे याची कबुली देतायेत. आता मोठा आर्थिक डोलारा असलेल्या ही योजना सुरु ठेवण्यासाठी सरकारची कसरत सुरु आहे. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी महायुती सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे म्हणजे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं. त्यातल्याही ज्यांचं आधार सीडिंग झालंय. त्या लाभार्थी महिलांना सन्माननिधीच्या वितरणाची सुरुवात झाली आहे.

पैसे येण्यास सुरुवात झाल्यानं लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त केलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात येत आहे.

त्यात 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश आहे. आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हफ्ता मिळणार आहे. 4 ते 5 दिवसांत टप्प्याटप्प्याने हे वितरण होणार आहे. पहिल्या दिवशी 67 लाखांहून जास्त महिलांना हप्त्याचं वितरण झालंय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना महायुती सरकार लाडकीला पैसे देण्याची तरतूद करत आहे. 1500 रुपयांवरुन 2100 हप्ता देण्याचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. तुर्तास लाडक्या बहिणींचा 2024 सरत्या वर्षाचा शेवट गोड झालाय हे नक्की..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT