Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Government : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाल्याच्या तक्रारींवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पडताळणी फक्त अपात्र लाभार्थ्यांसाठी नसून पात्र महिलांचे हप्ते मिळावेत यासाठी स्पष्ट करण्यात आलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली गेली. या योजनेचा लाभ आत्तापर्यंत लाखो महिलांनी घेतला. पुढे ई-केवायसी प्रक्रिया झाल्यानंतर काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेतायेत असं समोर आलं. त्यामुळे त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता वगळ्यात आला. पण या महिलांनामध्ये काही पात्र महिलांचाही लाभ वगळण्याची माहिती Indiatoday च्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रक्षाबंधन सण जवळ येत असताना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल परत एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये राज्यातल्या महिलांना गेला काही महिन्यांपासून लाडक्या बहि‍णींचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. प्रसिद्धा झालेल्या माहितीनुसार, राज्यातल्या ९२ लाख लाभार्थ्यांना पडताळणी करून योजनेतून वगळण्यात आलं आहे. महालेखापाल (CAG) च्या अहवालात योजनेबद्दल ३५०० कोटींच्या आर्थिक अनियमिततेचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

अकोला येथील मारुती नगर परिसरातल्या दोन महिलांच्या अनुभवामुळे हा मुद्दा जास्त चर्चेत आलेला आहे. संगीता गेडाम या महिलेला आजही दर महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता येतोय. तर या पैशातून त्यांच्या घरातला किराणा आणि दैनंदिन खर्च त्या भागवतात. पण निवडणुकीच्या वेळेस जाहीर करण्यात आलेली २१०० रुपयांच्या मदतीची घोषणा अजून पूर्ण झालेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच दुसरीकडे, पूनम कौसतर यांचा हप्ता गेल्या तीन महिन्यांपासून बंद झालेला आहे. त्यांनी ई- केवायसीसोबत सर्व आवश्यक प्रोसेस पूर्ण केली तरी बँक आणि संबंधित कार्यालयाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या पैशातून गॅस सिलेंडर, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, पात्र महिलांचे पैसे बंद केले जाणार नाहीत. सध्या सुरू असलेली पडताळणी फक्त अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आहे. पात्र महिलांना योजनेचा लाभ रोजच्या रोज मिळत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पडताळणी झाल्यावर पात्र महिलांच्या खात्यात पुन्हा हप्ते जमा होतात का, याकडे आता राज्यभरातल्या लाखो लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT