Kinetic Green Zulu Saam Tv
बिझनेस

Kinetic Green Zulu इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 104 km ची रेंज, फ्युचरिस्टिक लूक; जाणून घ्या किंमत

Kinetic Green Zulu इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 104 km ची रेंज, फ्युचरिस्टिक लूक; जाणून घ्या किंमत

Satish Kengar

Kinetic Green Zulu Electric Scooter Launched :

तरुणांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी क्रेझ आहे. यातच सोमवारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कायनेटिक ग्रीन झुलू लॉन्च करण्यात आली आहे. ही स्कूटर 94990 हजार रुपयांच्या प्रारंभिक किमतीत कंपनीने लॉन्च केली. बाजारात ही स्कूटर Ather 450S आणि Ola S1 X+ सारख्या नवीन जनरेशन स्कूटरशी स्पर्धा करते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 104 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर 2.1 kW पॉवरच्या BLDC हब मोटरसह सादर करण्यात आली आहे. मोटर स्कूटरला अतिरिक्त पॉवर देईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1360 मिमी व्हीलबेस

कायनेटिक ग्रीन झुलूची लांबी 1830 मिमी आहे, ज्यामुळे कमी जागेत तिला सहज वळवता येतं. यामध्ये 2.27 kWh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली असून या स्कूटरचे वजन 93 किलो आहे. अशातच या स्कूटरचे वजन कमी असल्याने घरातील महिला आणि वृद्ध व्यक्तींना ती रस्त्यावर सहज हाताळता येईल. (Latest Marathi News)

कंपनी 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यांत याची डिलिव्हरी सुरु करू शकते. कायनेटिक ग्रीन झुलूचा व्हीलबेस 1360 मिमी आहे. चांगला व्हीलबेस ड्रायव्हरला खडबडीत रस्त्यांवर सुरळीत प्रवास देईल.

कायनेटिक ग्रीन झुलू 15 amp सॉकेटमधून फक्त 30 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज होते. ही पॉवरफुल स्कूटर 60 kmph चा टॉप स्पीड देईल. यात स्टायलिश एप्रन माउंटेड हेडलॅम्प देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये एलईडी डीआरएलसह अलॉय व्हील आहेत. या EV स्कूटरमध्ये एक लांब सिंगल सीट आहे.

कायनेटिकच्या स्कूटरमध्ये ऑटो कट चार्जरची सुविधा असेल. यात डिजिटल स्पीडोमीटर, साइड स्टँड सेन्सर आणि फुल साइज हँडलबार आहे. स्कूटरचा बूट लाइट आणि ग्राउंड क्लीयरन्स 160 मिमी आहे. कायनेटिक ग्रीन झुलूची रुंदी 715 मिमी आहे. ही स्कूटर 150 किलोपर्यंत वजन सहज वाहून नेऊ शकते. यात टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि ड्युअल शॉक अॅब्सॉर्बर सस्पेंशन आहे. त्याच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT