Kia Sonet Facelift Features, Price (Details in Marathi) Google
बिझनेस

हाय टेक सेफ्टी फीचर्स, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टीमसह Kia Sonet facelift लाँच; जाणून घ्या किंमत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kia Sonet facelift Price Features And Specification:

किया ही कार उत्पादक कंपनी नावाजलेली आहे. कंपनीच्या अनेक नवीन कार येत्या वर्षात लाँच करणार आहे. कंपनीची नवीन SUV Kia Sonet facelift बाजारात लाँच झाली आहे. उत्तम फीचर्स आणि ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी एसयूव्ही लाँच झाली आहे.

किंमत

कियाची ही कार इतर कारपेक्षी थोडी वेगळी असेल. कंपनीच्या या कारमध्ये आकर्षक लूक आणि नवीन सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. ही कार ७.९९ लाख रुपयांना लाँच करण्यात आली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनसह लाँच करण्यात आली आहे. १९ प्रकारांमध्ये ही एसयूव्ही उपलब्ध आहे. या कारमध्ये २५ सेफ्टी फीचर्स, ७० कनेक्टेड फीचर्स आणि १५ हाय सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे. (Latest Business News)

डिझाइन (Design)

नवीन Kia Sonet कारचे डिझाइन सध्या बाजारात असलेल्या मॉडेलसारखेत आहे. या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स देण्यात आले आहे. कारचे फ्रंट बंपर आणि स्किड प्लेट्स पुन्हा तयार करण्यात आले आहे. या कारमध्ये होरिजॉंटल माउंटेड एलईडी फॉग लाइट्स लावण्यात आल्या आहेत. कंपनीने या कारमध्ये १६ इंचचे नवीन अलॉय व्हिल्स दिले आहेत.

एसयूव्हीच्या मागील बाजूस मोठा एलईडी रिअर लाइटबार देण्यात आला आहे. हा एसयूव्हीच्या c आकाराच्या टेललाइट्सना एकमेकांशी जोडतो. कारच्या मागील बंपर आणि रूफ माउंटेड स्पॉयरलाही नवीन डिझाइन देण्यात आले आगेय ही नवीन एसयूव्ही 8 मोनोटोन, दोन ड्युअल टोन आणि मॅट फिनिश पेंट शेडमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सेल्टोसचा प्यूअर ऑलिव्ह कलरचा ऑप्शन देण्यात आला आहे.

इंजिन

कंपनीने या नवीन कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीच्या कारप्रमाणेच ही कार तीन वेगवेगळ्या पर्यांयासह बाजारात लाँच झाली आहे. कारमध्ये 1.2 लिटर,4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 83hp ची पॉवर जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

कियाच्या नवीन कारच्या इंटेरि.रमध्ये बदल करण्यात आला आहे. याचे इंटेरियर 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या रुपात दिसते. याशिवाय कारमध्ये लहान स्क्रिनसह 10.25 टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम प्रदान करण्यात आली आहे. ही सिस्टीम तुम्हाला हवामान नियंत्रणासारखी माहिती देते.

ADAS सिस्टीम

या नवीन एसयूव्हीमध्ये लेव्हल-1 Advanced Driving Assistance System (ADAS) चा समावेश करण्यात आला आहे. ही सिस्टीम तुम्हाला ह्युंदाई वेन्यूमध्येदेखील मिळते. ADAS च्या फीचर्स पॅकमध्ये तुम्हाला फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, कोलिजन अवॉयडन्स असिस्टन्स, हाय-बीम असिस्ट आणि लेन कीप असिस्टसारखे फीचर्स देण्यात आले आहे.

सेफ्टी फीचर्स (Features)

ही नवीन कार सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप चांगली आहे. यामध्ये 6 एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कारमध्ये हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC)सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT