Kanyadan Scheme google
बिझनेस

Kanyadan Yojana: खुशखबर! मुलींच्या लग्नासाठी सरकार करतंय आर्थिक मदत; कन्यादान योजना आहे तरी काय?

Kanyadan Yojana For Girls Marriage: राज्य सरकारने मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेत लग्नासाठी सरकार आर्थिक मदत करते.

Siddhi Hande

Kanyadan Scheme Update: लेकीचा जन्म झाल्यापासूनच तिच्या आईवडिलांना तिची काळजी असते. तिचे शिक्षण, लग्न या सर्व गोष्टींसाठी आईवडिल फार पूर्वीपासूनच पैसे साठवत असतात. मुलींचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करावे, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. परंतु अनेकदा परिस्थितीमुळे असं काही करता येत नाही. त्यामुळेच राज्य सरकारने खास योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी खास कन्यादान योजना राबवली आहे.

राज्य सरकारच्या कन्यादान योजनेत मुलींच्या लग्नाचा खर्च केला जातो. अनुसूचित जातीच्या मुलींच्या पालकांना लग्नासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना लग्नासाठी मदत व्हावी, या हेतूने ही योजना राबवली आहे.

लग्नासाठी खर्च कमी व्हावा, यासाठी सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासाठी स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्य सरकारने कन्यादान योजना सुरु केली आहे.

कन्यादान योजना (kanyadan Scheme)

कन्यादान योजनेत नवीन लग्न झालेल्या वधूवरांना २०,००० रुपयांची मदत केली जाते.मुलीच्या आईवडिलांच्या नावाने ही मदत केली जाते. जेणेकरुन हे पैसे ते लग्नासाठी वापरु शकतात.या योजनेअंतर्गत वधू-वरांना सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करावे लागते. तसेच विवाहसोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेला ४००० रुपये दिले जातात.

पात्रता

या योजनेसाठी अर्ज करणारे वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावे. त्यांच्यापैकी एकजण तरी अनुसूचित जातीचा असावा. नवऱ्याचे वय २१ तर नवरीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. प्रथम विवाहासाठी हे अनुदान दिले जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा किंवा हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग केलेला नसावा. तसेच जातीचे प्रमाणपत्र हे अधिकाऱ्यांनी दिलेले असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT