IIT Job Crisis Saam Tv
बिझनेस

IIT Job Crisis: मिळेना नोकरी, देशात बेरोजगारी! आयआयटीला लागलंय Ai चं ग्रहण

IIT News: आयआयटी म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि नोकरीची गॅरण्टी. पण या वास्तवाला हादरा देणारी धक्कादायक माहिती समोर आलीय. आयआयटीतून पास झालेल्या तब्बल 35 ते 40 टक्के विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच झालं नसल्याचं कटू वास्तव समोर आलंय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

आयआयटी म्हणजे लाखोंचं पॅकेज आणि नोकरीची गॅरण्टी. पण या वास्तवाला हादरा देणारी धक्कादायक माहिती समोर आलीय. आयआयटीतून पास झालेल्या तब्बल 35 ते 40 टक्के विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच झालं नसल्याचं कटू वास्तव समोर आलंय.

इंजिनिअरिंग म्हटलं की अनेकांचं स्वप्न असतं ते आयआयटीत प्रवेश मिळवण्याचं. कारण एकदा आयआयटीत प्रवेश मिळाला की करियर सेट होतं असाच समज आहे. कारण आयआयटीच्या कँम्पस प्लेसमेंटसाठी जगभरातील नामांकित कंपन्या आयआयटीसमोर रांगा लावतात. मात्र आता परिस्थिती बदललीय. आयआयटीचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांना आरटीआयमधून मिळालेल्या माहितीत 23 आयआयटींमधून धक्कादायक आकडे समोर आलेत.

2023-24 चं भीषण वास्तव

  • देशातील 23 आयआयटीत 38 टक्के विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच नाही.

  • दिल्ली आयआयटीत यंदा 400 विद्यार्थ्याना नोकरी नाही.

  • 23 आयआयटीमधून 7000 विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी.

  • 2 वर्षापूर्वी 3400 विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती नोकरी.

देशातील बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर गेलाय. तर दुसरीकडे प्रवेश मिळाला की नोकरी मिळणार अशी खात्री असलेल्यांचंही टेन्शन आता वाढलंय. देशातील 23 आयआयटीतून तब्बल 7 हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच मिळाली नाही. त्यासाठी कोणती कारणं आहेत, ते जाणून घेऊ...

आयआयटी विद्यार्थ्यांना का मिळेना नोकरी?

1) चॅट जीपीटी आणि एआयने मोठ्या प्रमाणावर प्रभाव दाखवायला सुरुवात केलीय.

2) ज्या ठिकाणी 2 जण काम करत होते ते काम आता Ai करत आहे. त्यामुळे 30 टक्के नोकऱ्यांवर गंडांतर आलंय.

३) एखाद्या संस्थेने प्लेसमेंट केलंच तर मोठ्या पॅकेजेस परिणाम झालाय.

देशातील नोकऱ्यांसाठी पक्कं ठिकाण म्हणजे आयआयटीचा प्रवेश. पण या समजालाच आता धक्का बसलाय. एआय, चॅट जीपीटी यामुळे इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांना चांगलंच ग्रहण लागलंय. त्यामुळे आयआयटीत प्रवेश मिळाला तरी गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेलच याची गॅरण्टी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT