JIO LAUNCHES 11-MONTH VALIDITY PLAN FOR DUAL SIM USERS 
बिझनेस

Jio Special Offer: जिओची सुपरहिट ऑफर! ३३६ दिवसांसाठी सिम अ‍ॅक्टिव्ह राहील, Unlimited कॉलिंगसह धमाल बेनिफिट्स

Jio Recharge Plan: जिओने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. या खास प्लॅनमुळे सिम ३३६ दिवस सक्रिय राहील. अमर्यादित कॉलिंगसह डेटा आणि इतर फायदेही मिळणार आहेत.

Dhanshri Shintre

  • जिओने ड्युअल सिम यूजर्ससाठी दीर्घ वैधता असलेला नवा प्लॅन सादर केला.

  • ११ महिन्यांच्या वैधतेसह किफायतशीर दरात कॉल आणि एसएमएस सुविधा.

  • ४४८, ८९५ आणि १२३४ रुपयांच्या तीन नवीन योजनांमध्ये वेगवेगळे फायदे.

  • वारंवार रिचार्ज टाळू इच्छिणाऱ्या यूजर्ससाठी हा प्लॅन उपयुक्त पर्याय.

रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किमतींमुळे मोबाईल यूजर्समध्ये विशेषतः ड्युअल सिम कार्ड किंवा ड्युअल फोन असणाऱ्या ग्राहकांकडे चिंतेचे वातावरण आहे. दोन नंबर असणाऱ्यांना आता दर महिन्याला किंवा तिमाहीला होणाऱ्या रिचार्ज खर्चाचा ताण वाढलेला जाणवतो. अशा परिस्थितीत, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने या ग्राहकांसाठी दिलासा देणारा एक खास रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जो तब्बल ११ महिन्यांची वैधता देतो. तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या दीर्घकालीन प्लॅनसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

जिओने नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी विविध वैधतेच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांमध्ये स्वस्त पर्यायांपासून ते महागड्या प्रीमियम योजनांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. जरी या वर्षी कंपनीने अनेक रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या असल्या, तरी काही योजना अजूनही परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास सहन करू इच्छित नसलेल्या ग्राहकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.

या वर्षी जिओने आपल्या पोर्टफोलिओत कॉलिंग(Calling) आणि एसएमएस(SMS) प्लॅन्सचा समावेश केला आहे. या योजना विशेषतः कमी किमतीत दीर्घ वैधता देणाऱ्या अशा स्वरूपात डिझाइन करण्यात आल्या आहेत. सध्या जिओकडे अशा दोन प्रमुख योजना उपलब्ध आहेत. ज्यामध्ये इंटरनेट डेटा न देता फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा दिली जाते.

जिओ ४४८ रुपयांचा प्लॅन

४४८ रुपयांच्या किमतीत मिळणारी योजना सर्वात परवडणारी मानली जाते. यामध्ये यूजर्सना ८४ दिवसांच्या कालावधीत अमर्यादित कॉलिंगसह एकूण १००० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळते. त्याचबरोबर जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडसारख्या मनोरंजन व स्टोरेज सेवाही मोफत मिळतात.

जिओ १२३४ रुपयांचा प्लॅन

फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी अधिक दीर्घ वैधता हवी असल्यास, १२३४ रुपयांची योजना योग्य ठरते. या प्लॅनची वैधता तब्बल ३३६ दिवस आहे. त्यात अमर्यादित कॉलिंग आणि ३६०० एसएमएसचा लाभ मिळतो. यामध्येसुद्धा जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा प्रवेश दिला जातो.

याशिवाय, जिओ ८९५ रुपयांची आणखी एक योजना ऑफर करते. त्याची वैधता देखील ३३६ दिवसांची आहे. हा प्लॅन विशेषतः विद्यमान जिओ ग्राहकांसाठी आहे आणि यात कॉलिंगसह डेटा व एसएमएसही समाविष्ट आहेत. वाढत्या रिचार्ज दरांच्या पार्श्वभूमीवर, जिओचे हे दीर्घ वैधतेचे प्लॅन्स वारंवार रिचार्ज टाळून खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी अनेक यूजर्ससाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विदर्भात शिंदेंकडून भाजपला धक्का; बड्या नेत्यासह ४५ माजी नगरसेवक अन् १०० सरपंच भाजपची साथ सोडणार

La Nina : अतिवृष्टीनंतर राज्यावर आणखी एक संकट, आताच तयारीला लागा, IMD ने दिला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसवर दगडफेक

Whatsapp Crime : व्हॉट्सअ‍ॅपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग ठरली घातक! व्यावसायिकाला ४ लाखांचा फटका, नेमकं झालं काय?

Lakshmi Niwas: जान्हवीची जयंतपासून सुटका; भावना-सिद्धूच्या नव्या नात्याची सुरुवात 'लक्ष्मी निवास'मध्ये येणार 'हे' मोठे ट्विस्ट

SCROLL FOR NEXT