Airtel Cheapest Plan: 3 महिने रिचार्जची गरज नाही, एअरटेलने सादर केले बजेट-फ्रेंडली प्लॅन; वाचा किंमत आणि फिचर्स

Dhanshri Shintre

एअरटेल रिचार्ज प्लॅन

एअरटेलकडे विविध रिचार्ज प्लॅन आहेत. आज आपण ८४ दिवसांची वैधता देणाऱ्या सर्वात परवडणाऱ्या प्लॅनची माहिती पाहूया.

मेसेजिंगची सुविधा

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह मेसेजिंगची सुविधाही मिळते, त्यामुळे हा प्लॅन खूप लोकप्रिय ठरतो.

४६९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा ₹४६९ रुपयांचा प्लॅन यूजर्सना आकर्षक फायदे आणि तब्बल ८४ दिवसांची वैधता प्रदान करतो.

लोकल आणि एसटीडी

एअरटेलचा ₹४६९ रिचार्ज प्लॅन यूजर्सना लोकल आणि एसटीडी दोन्ही प्रकारच्या अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देतो.

एसएमएसची सुविधा

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण ९०० एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळते, जी दैनंदिन संवादासाठी उपयुक्त आहे.

इंटरनेट डेटा

या एअरटेल प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही, त्यामुळे डेटा वापरासाठी स्वतंत्र पॅकने रिचार्ज करणे आवश्यक आहे.

परप्लेक्सिटी प्रो एआय

एअरटेलच्या ग्राहकांना प्रति वर्ष ₹१७,००० किमतीच्या परप्लेक्सिटी प्रो एआय सेवेसाठी मोफत प्रवेशाची सुविधा दिली जाते.

मोफत ट्यून सेट

या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना ३० दिवसांसाठी मोफत ट्यून सेट करण्याची सुविधा देखील मिळते.

स्पॅम अलर्ट सुविधा

एअरटेल सर्व ग्राहकांना इनकमिंग कॉल आणि एसएमएससाठी स्पॅम अलर्ट सुविधा देतो, जी अनवांछित संपर्क रोखण्यास मदत करते.

NEXT: एअरटेलचा वार्षिक रिचार्ज प्लॅन; कॉलिंग, डेटासह मिळवा अनेक फायदे, किंमत किती?

येथे क्लिक करा