jio  goggle
बिझनेस

Jio Recharge Plan: JIO कंपनीच ग्राहकांना दिलासा! १०१ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार 5GB मोफत डेटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या जीवनात मोबाईल फार गरजेचा आहे. मोबाईलमुळे नागरिकांच्या अनेक समस्या दूर होत असतात. नागरिक कुठेही कधीही मोबाईलमुळे आपले काम सहजरित्या पूर्ण करु शकतात. पण रोजच्या जीवनातील मोबाईल जसा गरजेचा आहे, तसाच त्यामधील डेटा देखील खूप गरजेचा आहे. म्हणून भारतातील जिओ कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लान घेऊन येत असते. त्याबरोबर त्यामधील अपग्रेड फीचर्सची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवत असते. ज्याचा फायदा यूजर्सनां मोठ्या प्रमाणात होत असतो. यूजर्सच्या याच गोष्टीकडे लक्ष देत जिओ कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन रिजार्ज प्लान लाँच केला आहे. नवीन रिचार्ज प्लानमुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या रिचार्ज प्लानचा ग्राहकांना काय फायदा होणार आहे, हे जाणून घेऊयात.

जिओ कंपनी नेहमीच यूजर्ससाठी नवनवीन रिचार्ज प्लान काढत असते. जिओ कंपनीने काही महिन्यापूर्वीच रिचार्ज प्लानची किंमत बददली होती. यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा झाला होता. आता ही जिओ कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे युजर्सच्या मनात डेटा बद्दल एक चिंता निर्माण झाली आहे. पण जिओ कंपनीने यूजर्सच्या या गोष्टीकडे लक्ष देत, १०१ रुपयांचा नवीन डेटा प्लान लाँच केला आहे. १०१ रुपयांच्या डेटामुळे ग्राहकांना अनेक फीचर्ससह खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोर हा रिचार्ज प्लान यूजर्सनां 5GB डेटा ऑफर करणार आहे.

जिओ कंपनीचा १०१ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओ कंपनीच्या या नवीन रिचार्जमुळे ग्राहकांना फक्त १०१ रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा १०१ रुपयांचा रिचार्ज प्लान 'ट्रू अनलिमिटेड अपग्रेडस' सह यूजर्ससाठी येत आहे. जिओ कंपनीने काढलेल्या या रिचार्ज प्लानमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार नाहीये. जिओ कंपनीने काढलेल्या या नवीन फीर्चसमुळे ग्राहकांना अनलिमिटेड कॅाालिंग, अनलिमिटेड एसेमेसचा पुरेपुर फायदा घेता येणार आहे. त्याचबरोबर ग्राहक अनलिमिटेड डेटाचा पुरेपुर फायदा घेऊ शकणार आहे.

Health Tips: अॅसिडीचा त्रास होतोय? रोज खा अंजीर

Maharashtra Politics: 'आमदारकी पणाला लावून गुवाहाटीला गेलो म्हणून भाजपची सत्ता...', शिंदेंच्या आमदारांचा अमित शहांवर पलटवार

Maharashtra News Live Updates: सर्वच पक्षाचा सस्पेन्स कायम असतो, २२ तारखेपासून उमेदवारी भरायची - धनंजय मुंडे

Beed Vidhan Sabha : बीडमध्ये शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी समोर; उमेदवारी कोणाला? पक्षप्रमुखासमोर असणार आव्हान

IND vs NZ : रोहित २, विराट ०, राहुल ०...'किवी'पुढे भारताचा ४६ धावांत सुपडा साफ, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

SCROLL FOR NEXT