बिझनेस

Jio Annual Plan : जिओचा भन्नाट वार्षिक प्लॅन! एकदाच रिचार्ज करा अन् मिळवा ९१२.५ GB डेटा अन् बरेच काही...

Jio Recharge Offer: जिओने वार्षिक वैधतेसह दोन आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांसाठी ९१२.५ जीबी डेटा, मोफत जिओ टीव्ही आणि इतर फायदे दिले जातात.

Dhanshri Shintre

रिलायन्स जिओने आपल्या यूजर्ससाठी ३६५ दिवस वैधतेचे आणि भरपूर डेटासह काही आकर्षक प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. जर तुम्ही वर्षभरासाठी इंटरनेट वापराचा विचार करत असाल, तर जिओचे ३९९९ रुपये आणि ३५९९ रुपयाचे दोन प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

हे दोन्ही प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतात आणि यूजर्सना दररोज २.५ जीबी डेटा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारे वर्षभरात एकूण ९१२.५ जीबी डेटा वापरण्याची सुविधा मिळते. याशिवाय, पात्र यूजर्सना जिओकडून अमर्यादित ५जी डेटाचाही आनंद घेता येणार आहे.

जिओचा ३९९९ रुपयांचा प्लॅन

या दोन्ही प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली गेली आहे. तसेच दररोज १०० मोफत एसएमएस संदेशांचा लाभ ग्राहकांना मिळतो. जिओच्या ३९९९ आणि ३५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मनोरंजनासाठीही भरपूर सुविधा आहेत. यूजर्सना जिओ टीव्ही(JioTv), जिओ सिनेमा(JioCinema) आणि जिओ हॉटस्टारचा(JioHotstar) मोफत प्रवेश मिळतो. फॅन कोडसाठी मोफत सबस्क्रिप्शनही या ऑफरमध्ये दिले जाते, जे विशेषतः क्रीडा प्रेमींसाठी आकर्षक ठरू शकते.

जिओने आपल्या ९व्या वर्धापन दिनानिमित्त या प्लॅनमध्ये काही खास सेलिब्रेशन ऑफरही समाविष्ट केल्या आहेत. ग्राहकांना जिओ फायनान्सद्वारे २ टक्के अतिरिक्त सूट मिळते, तर घरगुती यूजर्ससाठी जिओ होमची दोन महिन्यांची मोफत ट्रायल दिली जाते. तसेच जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि जिओ टीव्ही सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. क्लाउड सेवांचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी जिओ एआय क्लाउडवर ५० जीबी मोफत स्टोरेजही या ऑफरमध्ये दिले जाते.

एकूणच, जिओचे हे दोन्ही वार्षिक प्लॅन यूजर्सना डेटा, कॉलिंग आणि मनोरंजनसेवा या सर्व बाबतीत भरपूर किंमत देणारे आहेत. दीर्घ वैधतेसह दररोज भरपूर डेटा आणि मोफत डिजिटल सेवांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जिओ ग्राहकांसाठी हे दोन्ही प्लॅन एक संपूर्ण आणि आकर्षक पर्याय ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

Ovarian Cancer Symptoms: जेवण जात नाही, झोप होत नाही; गर्भाशयाचा कॅन्सर तर नाही ना? 'ही' लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा

Jalgaon Crime : जळगाव हादरले; कुसुंबा येथे घरावर दगडफेक करत केला गोळीबार

कंपनी मॅनेजरच्या मृत्यूचं गूढ वाढलं; हत्येचा संशय? पत्नीच्या कॉल डिटेल्सवर पोलिसांचे लक्ष

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला का खास मानले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT