Jharkhand Government Saam Tv
बिझनेस

Jharkhand News : महिलांना २५०० रुपये मिळणार, योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Maiya Sanman Yojana: झारखंड सरकारने महिलांसाठी मैया सन्मान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत आता महिलांना २५०० रुपये मिळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसले. शपथविधी झाल्यानंतर त्यांनी लगेचच कॅबिनेट मीटिंग बोलावली यात त्यांनी दोन मोठे निर्णय घेतले. (Jharkhand Government Descision)

हेमंत सोरेन यांनी अनुराग गुप्ता यांनी डीजीपी पद दिले.त्याचसोबत त्यांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यापासून मैया सम्मान योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता डिसेंबर महिन्यापासून २,५०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले आहे.

महिलांना मिळणार २५०० रुपये

सध्या मैया सम्मान योजनाअंतर्गत महिलांना १००० रुपये दिले जात होते. मात्र, याची रक्कम आता वाढवण्यात आली आहे. महिलांना डिसेंबर महिन्यापासून २५०० रुपये दिले जाणार आहेत.

झारखंड सरकारने ऑगस्ट महिन्यात ही योजना सुरु केली होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. (Maiyaa Sanman Yojana)

पात्रता

या योजनेअंतर्गत अर्ज करणारी महिला झारखंडची रहिवासी असायला हवी.

२१ ते ४९ वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत अर्ज करु शकतात.

या महिलांना मिळणार नाही लाभ (Maiyaa Sanman Yojana Eligibility)

जर महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असेल किंवा त्यांना सरकारी पेन्शन मिळत असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

महिलांच्या परिवारातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावेत.

कुटुंबातील कोणतही सदस्य कर भरत असेल तर त्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जर महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ईपीएफ खातेधारक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत. (Jharkhand Government Maiyaa Sanman Yojana)

अर्ज कसा करायचा? (Maiyaa Sanman Yojana Application Process )

या योजनेअंतर्गत तुम्हाला अंगनवाडी केंद्रात जाऊन अर्ज दाखल करायचा आहे. तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करुन तो भरु शकतात.

या योजनेअंतर्गत अर्जासोबत तुम्हाला फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड,बँक पासबुक हे कागदपत्रेदेखील जमा करायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT