Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

ITR Refund: आयटीआर रिफंड अडकला आहे? ही असू शकतात कारणे; आताच करा हे काम

ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेकांनी आयटीआर फाइल केला आहे. त्यातील अनेकांचे रिफंड अडकले आहेत. त्यामागची कारणे जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख

२० दिवसांत जमा होणार रिफंड

रिफंड उशिरा येण्याची कारणे

आयकर विभागाने सांगितलं कारण

इन्कम टॅक्स रिफंड स्टेट्स कसा चेक करायचा

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आयकर विभागाने यावर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख वाढवून दिली आहे. तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. दरम्यान, आतापर्यंत हजारो करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे.आयटीआर फाइल केल्यानंतर रिफंड जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

आयटीआर फाइल केल्यानंतर महिनाभर किंवा २० दिवसांमध्ये रिफंड येतो. दरम्यान, अनेकांचे टॅक्स रिफंड अजून जमा झालेले नाहीत. तुमचे रिफंडचे पैसे अडकले आहेत. दरम्यान, तुमचे पैसे का अडकले आहेत याबाबत आयकर विभागाने माहिती दिली आहे.

टॅक्स रिफंडला विलंब होण्याचे कारण (Why Income Tax Refund Delay)

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्स रिफंड येण्यास जर उशीर झाला तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. सिस्टीममधील स्वयंचलित पडताळणी आणि अतिरिक्त जोखीम मूल्यांकन तपासणी यामुळे झाला होता. कोणत्याही प्रकारच्या चुकीचा दावा पास होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा आहेत. त्यामुळे पडताळणी करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो.परंतु लवकरच आयटीआर प्रोसेसिंग जलद केली जाईल. त्यामुळे उर्वरित दावे लवकरच निकाली काढले जातील, असं आयकर विभागाने सांगितले आहे.

इन्कम टॅक्स स्टेटस कसा चेक करायचा? (How To Check Income Tax Status)

सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे.

यानंतर Income Tax Return या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर View Filed Return वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १२,००० स्पेशल ट्रेन चालवणार

Maharashtra Live News Update: शहर बकाल करण्यासाठी कुणीही अनधिकृत हार्डिंग लावू नका- अजित पवार

Lalit Prabhakar: प्रियसीच्या आठवणीत ललित प्रभाकर घालणार 'गोंधळ'; 'आरपार'मधील 'जागरण गोंधळ' गाणं प्रदर्शित

प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई - कोकण वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल; मध्य रेल्वेचा निर्णय

Manoj Jarange: सरकारला दंगल घडवून आणायचीय" – मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT