ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling 2025 : फक्त ४८ तास उरले, अजूनही आयकर रिटर्न भरला नाही? आता काय होणार

ITR Filling 2025 Deadline: आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख

आयटीआर फाइल करण्यासाठी उरले शेवटचे २ दिवस

आयटीआर फाइल न केल्यास काय होणार?

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. दरम्यान, तुम्ही आतापर्यंत आयटीआर फाइल केले नसेल तर लगेच करा. जर तुम्ही आयटीआर फाइल केला नाही तर काय होईल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दरम्यान, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

आयकर विभागाच्या (Income Tax Department) नियमानुसार,जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला ५००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तुम्ही दंड भरल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. यालाच बिलेटेड आयटीआर म्हणलतात. दरम्यान, तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही किंवा बिलेटेड आयटीआरदेखील भरला नाही तर तुमच्यावर कारवाई होई शकते.

मुदतीपूर्वी आयटीआर न भरल्यास काय होणार? (If You Dont File ITR Before Deadline Then What Happened)

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. त्याआधी तुम्ही आयटीआर फाइल करावा.

लेट पेमेंट फी

जर तुम्ही वेळेवर आयटीआर भरला नाही तर कलम 234F अंतर्गत तुम्हाला ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागले. जर तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर १००० रुपये आणि वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ५००० रुपये दंड भरावा लागेल.

टॅक्स ड्यूवर व्याज

तुम्हाला आयकर कलम 234A अंतर्गत उशिरा आयटीआर फाइल केल्यास कर देयावर व्याज लागू केले जाईल.

रिफंड येण्यास उशिर

जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर रिफंड येण्यास उशिर होऊ शकतो. याचसोबत उशिरा आयटीआर फाइल केल्यास आयकर विभाग पडताळणी करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Priyadarshini Indalkar: 'अधुरी बातों की तरह...'; 'दशावतार' निमित्त प्रियदर्शनी इंदलकरचा दिलकश अंदाज

'कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा...'मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून पक्षाला जय महाराष्ट्र, मनातील खदखद बोलून दाखवली

SCROLL FOR NEXT