ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर फाइल करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

ITR Filling Update: आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करताना तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या आहेत. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. त्याआधी सर्वांनी आयटीआर फाइल करायला हवे. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही आयटीआर भरताना विशेष काळजी घ्यायची आहे. आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआर फाइल करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

योग्य फॉर्म निवडणे (Choose Right ITR Form)

आयटीआर फाइल करताना तुम्हाला योग्य फॉर्म निवडणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या उत्पन्नाच्या वयोगटासाठी वेगवेगळे फॉर्म आहेत. १ते ४ फॉर्म हे लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आहे. या फॉर्मबाबत आयकर विभागाने आधीच माहिती दिली आहे. फॉर्म नंबर १७ हा ट्रस्ट आणि चॅरिटेबर इन्स्टिट्यूशंससाठी आहे. याबाबत आयकर विभागाने ११ मे रोजी माहिती दिली. त्यामुळे तुम्ही कोणत्या श्रेणीत येता त्यानुसार फॉर्मची निवड करा.

काही फॉर्ममध्ये बदल (Changes In ITR Form)

आयकर विभागाने यावेळी आयटीआर १ आणि आयटीआर ४ मध्ये मोठा बदल केला आहे. आता जे सॅलरीड कर्मचारी आणि असे करदाते जे प्रिजम्टिव्ह टॅक्सेशन स्कीमअंतर्गत येतात. त्यांना लाँग टर्म गेन १.२५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर आयटीआर १ आणि आयटीआर ४ चा वापर करु शकतात.

जुनी की नवी करप्रणाली (Choose Old Or New Tax Regime)

आयकर विभागाने कर्मचाऱ्यांना जुनी किंवा नवीन करप्रणाली निवडण्याचा ऑप्शन दिला आहे. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला कोणती करप्रणाली फायद्याची हे पाहून तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात. सध्या नवीन करप्रणालीत १२.७५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT