आयटीआर फाइल करण्याची आज शेवटची तारीख
मुदतीनंतरही फाइल करता येणार आयटीआर
बिलेटेड आयटीआर आहे तरी काय?
करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता आयटीआर भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. आज आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आयटीआर फाइल केला नसेल तर लवकरात लवकर करा . दरम्यान, आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढण्याची शक्यता खूप कमी आहे. अन्यथा तुम्हाला फटका बसेल. याचसोबत तुम्हाला आयकर विभागाची नोटीसदेखील येऊ शकते. दरम्यान, तुम्ही मुदतीनंतरही आयटीआर फाइल करु शकतात.
मुदतीनंतरही फाइल करता येणार आयटीआर
आतापर्यंत ६.३ कोटीपेक्षा जास्त करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. दरम्यान, अजूनही अनेकांचे आयटीआर फाइल करणे बाकी आहे. जे लोक मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करणार नाहीत ते लोक ३१ डिसेंबरपूर्वी बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. बिलेटेड आयटीआर म्हणजे मुदतीनंतर आयटीआर फाइल करणे.
तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. कलम 234F अंतर्गत उशिरा आयटीआर फाइल करण्यासाठी दंड भरावा लागेल. याचसोबत तुमच्या उत्पन्नाच्या आधारे व्याजदरदेखील भरावे लागणार आहे. ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ५००० रुपये दंड भरावा लागेल.
बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची मुदत उलटून गेली तर...
जर तुमची बिलेटेड आयटीआर भरण्याचीही तारीख चुकली तर तुम्ही आयटीआर यू फाइल करु शकतात. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्या अटींचे पालन केल्यानंतरच तुम्हाला आयटीआर फाइल करावा लागणार आहे. याचसोबत तुम्हाला अतिरिक्त टॅक्स भरावा लागेल. याचसोबत दंडदेखील भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.