Gold Silver Price Today (9th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (9th October): महागाईसोबत 'युद्ध' सुरू....पहिली झळ सोन्या-चांदीला; मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रात किती आहे आजचा भाव? यादीच वाचा

Today's (9th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra :जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th October):

इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्राइलवर हल्ला केला त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी इस्त्राइलने युद्धाची घोषणा केली. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर उच्चांकी दरापेक्षा जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झाले होते. अशातच युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. युद्धामुळे सुवर्णनगरी जळगावात आज सोन्याच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर काल सोन्याचे दर ५८ हजार ५०० रुपये प्रतितोळा इतके होते.

1. सोन्याच्या दरात वाढ

सोन्याच्या (Gold) दराने आजही मोठी उच्चांकी गाठली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेटनुसार सोन्याचा आजचा भाव हा ५, ३५० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी प्रति तोळा ५८,३५० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे आज सोन्याच्या भावात २२०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

2. चांदीचा आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार चांदीसाठी (Silver) प्रति किलो ७२,६०० रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना जास्तीचे पैसे (Price) मोजावे लागतील.

3. शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती

मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,२०० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,२३० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,२०० आज मोजावे लागतील. ठाण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,२०० रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT