Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : जिद्द! नोकरी सोडली अन् यूपीएससी दिली, IPS साठी सिलेक्शन पण IRS ची केली निवड; नेहा नौटियाल यांचा प्रवास

Success Story Of IRS Neha Nautiyal: नेहा नौटियाल यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी नोकरी करत अभ्यास केला. त्यांची निवड आयपीएस पदासाठी झाली होती. परंतु त्यांनी आयआरएस पदाची निवड केली.

Siddhi Hande

नेहा नौटियाल यांचा प्रवास

यूपीएससी परीक्षेत १८५ रँक प्राप्त

नोकरी करताना केला यूपीएससीचा अभ्यास

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत करतो. जर तुम्ही कामात सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं. असंच काहीसं नेहा नौटियाल यांच्यासोबत झालं. त्यांनी यूपीएससी परीक्षेत १८५ रँक प्राप्त केली. त्या सध्या IRS पदावर कार्यरत आहेत.

नेहा नौटियाल या मूळच्या उत्तराखंडच्या देहारादूनच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते. त्यांची आई गृहिणी आहे. त्या कुटुंबातील सर्वात लहान आहेत. त्यांनी नेहमीच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.

शिक्षण

नेहा यांचे शिक्षण उत्तराखंडमध्ये झाले. यानंतर त्यांनी राजस्थानमधील अजमेरमधून ४ वर्षांचा बीएससी-बीएड केले. यानंतर त्यांनी जूलॉजीमध्ये एमएससी पदवी प्राप्त केली. याचसोबत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.

दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक

नेहा यांनी नोकरी करता करता यूपीएससी (UPSC) परीक्षेचा अभ्यास केला. मात्र, काही दिवसांनी त्यांनी नोकरी सोडून फुल टाइम परीक्षेचा अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात त्यांची निवड झाली नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेत १८५ रँक प्राप्त केली. त्यांची निवड आयपीएस पदासाठी झाली होती. मात्र, त्यांनी आयआरएस पदासाठी काम करणे निवडले.

नेहा यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला दिले. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी अभ्यासानंतर रिवीजन करण्यावर फोकस केला. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट; शत्रू राष्ट्रांचं कनेक्शन उघड

Tadgola Ice Cream Recipe : बाजारातील आईस्क्रीमला करा टाटा, बाय बाय; घरीच बनवा गारेगार ताडगोळा Ice Cream

8th Pay Commission: १३ एप्रिलला फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक

Maharashtra News Live Update: ठाण्यातील एक दुचाकी अचानक पेटली

Hair Growth Tips : ना महागड्या हेअर ट्रीटमेंट, ना घरगुती उपाय; 'हे' ४ सुपरफूड खाऊन केसांची वाढ होईल झटपट

SCROLL FOR NEXT