Railway Stocks Rally Saam tv
बिझनेस

Railway Stocks Rally: बजेटआधीच रेल्वेच्या शेअर्समध्ये दमदार तेजी; गुंतवणूकदार होताहेत मालामाल

Railway Stocks Share Market: शेअर्स मार्केटमध्ये रेल्वेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. IRFC ते IRCTC पर्यंतच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. NSE वर गेल्या एका महिन्यांपासून रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडचे शेअर्स ९३ टक्क्यांनी वाढले आहेत.

Vishal Gangurde

Share Market News Today:

शेअर्स मार्केटमध्ये रेल्वेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. IRFC ते IRCTC पर्यंतच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. NSE वर गेल्या एका महिन्यांपासून रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडचे शेअर्स ९३ टक्क्यांनी वाढले आहेत. तर रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सने ८७ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. (Latest Marathi News)

IRCTCच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात २९ टक्के रिटर्न दिले आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या बजेटआधीच टीटागड रेल सिस्टम्सचे शेअर्सने एका महिन्यात १९ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाआधीच रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वेच्या स्टॉकने उसळी का घेतली?

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, प्रभुदास लीलाधर यांनी म्हटलं की, 'सध्या रेल्वेने आधुनिकीकरण आणि वंदे भारत ट्रेन्सवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेचं आर्थिक वर्ष २४ एप्रिल-नोव्हेंबरमध्ये भांडवली खर्चात ३१ टक्के वाढ केली आहे. रेल्वेचा हा खर्च इतर विभागांपेक्षा अधिक आहे'.

सरकारचं रेल्वे, रस्ते आणि डिफेंसवर लक्ष

रिपोर्टनुसार, एलारा कॅपिटलने म्हटलं की, 'सरकार आता रेल्वे, रोड आणि डिफेंन्सच्या खर्चावर प्राधान्य देत आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, बजेटमध्ये या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे'. (Railway Update)

सरकार ६० टक्के खर्च रेल्वे, रस्ता आणि डिफेन्सवर करणार

एलारा कॅपिटलने म्हटलं आहे की, आगामी आर्थिक वर्षात भांडवली खर्चात २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रांकडून राज्यांना वर्षाला ३०,०००० कोटी रुपयांचं कर्ज देण्याची शक्यता आहे. तर सरकार भांडवली खर्चातील ६० टक्के हे रस्ते, रेल्वे आणि डिफेन्सवर खर्च करण्याची शक्यता आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT