भारतीय रेल्वे ऑगस्ट 2026 पासून नवीन आरक्षण प्रणाली लागू करणार.
IRCTC वरील तिकीट बुकिंग अधिक जलद, सुलभ आणि विश्वासार्ह होणार.
वाढत्या प्रवासीसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होणार.
आपण रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी आपण IRCTC चा अॅपचा वापर करत असतो. आता या अॅपमध्ये मोठा बदल केला जाणार असून तिकीट आरक्षण प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तिकीट बुक करताना येणारी तांत्रिक अडचण आता दूर होणार आहे.
ऑगस्ट २०२६ पासून भारतीय रेल्वे नव्या आणि अत्याधुनिक आरक्षण प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. यामुळे तिकीट बुकिंग अधिक जलद, सुलभ आणि विश्वासार्ह होईल, अशी आशा आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, वाढत्या प्रवासीसंख्येमुळे आरक्षण प्रणालीवर मोठा ताण येत आहे. दररोज लाखो प्रवासी ऑनलाइन तिकीट बुक करतात. सण, सुट्ट्या किंवा विशेष सणांच्या काळात ही संख्या वाढत असते. त्यामुळे अनेकदा वेबसाइटचा वेग कमी होत असतो, परंतु आता नव्या प्रणालीमुळे या समस्या येणार नाहीत.
नवीन आरक्षण प्रणाली आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने IRCTC ची वेबसाइट आणि मोबाईल अॅप आधीपेक्षा अधिक जलद होणार आहे. तिकीट शोधणे, जागांची उपलब्धता तपासणे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी लागणारा वेळ कमी करण्यास मदत करणार आहे. वेटिंग लिस्ट, RAC आणि तिकीट कन्फर्मेशन स्टेटस यासंबंधीची माहितीही प्रवाशांना अधिक वेगाने उपलब्ध करून देण्याची रेल्वेची योजना आहे. त्यामुळे संपूर्ण आरक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली विद्यमान आरक्षण प्रणाली वाढत्या डिजिटल वापर आणि प्रवाशांच्या संख्येनुसार असक्षम ठरत आहे. यामुळे ही प्रणाली अद्यावत करण्यात आली आहे, या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, या अपग्रेडमुळे तिकीट बुकिंगचा वेग वाढला आहे. सर्व्हरवरील ताण कमी होईल आणि वेबसाइट तसेच मोबाईल अॅपचा वापर अधिक सुरळीत होईल. तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान याचा सर्वाधिक फायदा प्रवाशांना होणार आहे.
नव्या आरक्षण प्रणालीची प्रोसेसिंग क्षमता वाढवण्यात आली आहे. अहवालांनुसार, नवीन प्लॅटफॉर्म एकाच वेळी अनेक पटींनी अधिक तिकीट विनंत्या हाताळू शकणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत किंवा तत्काळ बुकिंगदरम्यान तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोठ्या प्रमाणातील ट्रॅफिकमुळे वेबसाइटवर अडचणी निर्माण होतात. मात्र नव्या प्रणालीची रचना अशा परिस्थितींना प्रभावीपणे हाताळण्यासाठी करण्यात आलीय. दरम्यान दररोज लाखो प्रवासी मर्यादित जागांसाठी काही मिनिटांत तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. नव्या प्रणालीमुळे तत्काळ बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रवाशांना कमी वेळेत तिकीट बुक करता येईल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.