IRCTC Rule Change Saam tv
बिझनेस

IRCTC चा मोठा निर्णय! फक्त या प्रवाशांनाच बुक करता येणार तिकीट; वाचा सविस्तर

IRCTC Ticket Booking Rule Change: आयआरसीटीसीने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत आधार वेरिफाइड प्रवाशांनाच तिकीट बुक करता येणार आहे.

Siddhi Hande

IRCTC चा मोठा निर्णय

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात केले बदल

आता फक्त आधार वेरिफाइड युजर्संना करता येणार तिकीट बुक

भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केले आहेत.आता २८ ऑक्टोबर २०२५ पासून आता ट्रेनचं तिकीट बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन करणे गरजेचे आहे. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ट्रेनचं तिकीट बुक करायचे असेल तर आधार ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणी येतील. ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये अनेक फ्रॉड होतात, हे रोखण्यासाठी रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आधार व्हेरिफाइड युजर्स करु शकणार तिकीट बुकिंग

आयआरसीटीसीने (IRCTC)या नवीन नियमाबाबत माहिती दिली आहे. २८ ऑक्टोबरपासून सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत फक्त आधार वेरिफाइड युजर्स तिकीट बुक करु शकतात.या काळात सर्वाधिक प्रवासी तिकीट बुक करतात. त्यामुळे अनेक फ्रॉडर्स लगेच अनेक तिकीटे बुक करतात. त्यामुळे इतर प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही.

सकाळी ८ ते १० तासात सर्वाधिक तिकीट बुक केली जाते. यामध्ये ऑटोमेटेड बुकिंग सॉफ्टवेअर किंवा एजंट्स खूप तिकीटे बुक करतात आणि जास्त दरात विकतात. यामुळे प्रवाशांना फटका बसतो. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर वेळेस आधार ऑथेंटिकेशन गरजेचे नाही

सकाळी १० वाजल्यानंतर तिकीट बुक करताना आधार ऑथेंटिकेशनची गरज नाही. इतर वेळी सामान्य युजर्स आपल्या अकाउंटवरुन तिकीट बुक करु शकतात. दरम्यान, सकाळी जेव्हा तिकीट विक्री सुरु होते तेव्हा ८ ते १० या काळात आधार वेरिफाइड युजर्स तिकीट बुक करु शकतात.

आधार लिंक कसे करायचे?

सर्वात आधी www.irctc.co.in या वेबसाइटवर जा.

तिथे तुम्हाला माय अकाउंटमध्ये Authenticate User या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर टाका. स्क्रिनवर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि लिंग याबाबत माहिती भरायची आहे.

यानंतर ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय करा.

यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन झाल्याचा मेसेज दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT