Petrol-Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागणार? इराण-इस्त्राइल युद्धामुळे दर वाढीचा स्फोट होणार, लेटेस्ट अपडेट

petrol diesel price hike : इराण-इस्त्राइल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. भारतात पेट्रोल-डिझेल दर सध्या स्थिर असले तरी जागतिक बाजारातील वाढ कायम राहिल्यास दरवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.

Namdeo Kumbhar

will petrol prices increase in India due to Iran Israel war : इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या युद्धाच्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीने ८० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या किमतींमुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार का? अशी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारताकडे फक्त १० दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दरवाढीचा स्फोट होणार का? याची चिंता भारतीयांना सतावत आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आणि तेहरानने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ८० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. तर अमेरिकेत व्यापार होणारे कच्चे तेल ८.६ टक्क्यांनी वाढून ७२.७९ डॉलर्सवर पोहोचले आहे.

भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात भाव वाढले की त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. सध्याच्या घडीला तेल कंपन्यांनी भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल केलेला नाही. पण जर कच्च्या तेलाचे भाव असेच वाढत राहिले, तर येणाऱ्या काळात इंधन दरवाढीचे संकट ओढवू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. इंधन महागले तर मालवाहतुकीचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईवर होतो.

एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सारख्या पेट्रोलियम कंपन्या किमती जास्त असताना तोटा सहन करत आहेत आणि दर कमी असताना नफा कमवत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे सरकार सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यावर भर देऊ शकते. सध्या पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत, पण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत राहिल्या तर दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता नाकारू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi Breakfast : बाहेरून खुसखुशीत अन् आतून रसाळ; होळीला खास घरीच बनवा हलवाई स्टाइल बालूशाही

Rashmika-Vijay Wedding : विजयचा हात धरून रश्मिका बसली पूजेला, पारंपरिक लूकमध्ये 'नॅशनल क्रश'ला लोक पाहतच राहिले|VIDEO

Maharashtra Live News Update : धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल

EPFOचा मोठा निर्णय! PF वरील नवीन व्याजदर निश्चित; किती असणार? वाचा सविस्तर

Rajbhog Recipe: होळी करा स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी आणि रसाळ राजभोग रेसिपी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT