World's Top 10 Billionaires List
World's Top 10 Billionaires List  Saam TV
बिझनेस

Iran-Israel: इस्रायल-इराण युद्धात शेअर बाजार होरपळला, श्रीमंतांनी गमावले कोट्यवधी रुपये; सर्वाधिक नुकसान कोणाचे?

Satish Daud-Patil

World's Top 10 Billionaires List

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून येतोय. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे या युद्धाचा फटका जगातील श्रीमंत व्यक्तींना देखील बसला आहे.

युद्धामुळे जगातील टॉप १० श्रीमंत लोकांच्या संपत्तीत सुमारे २८ अब्ज डॉलर्स म्हणजेच २३,३९,९७,८२,००,००० रुपयांची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, इलॉन मस्क यांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यांची एकूण संपत्ती ६.८४ अब्ज डॉलरने घसरली आहे.

श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३.११ अब्जची घट झाली आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती ४.०८ अब्ज डॉलरने घसरून १७८ अब्ज झाली आहे. बिल गेट्सच्या संपत्तीतही १.६५ अब्जची घट झाली.

स्टीव्ह बाल्मरच्या संपत्तीत २.६९ अब्ज, लॅरी पेजची २.४३ अब्ज, वॉरेन बफेची १.३२ अब्ज आणि सेर्गे ब्रिनची संपत्ती २.३० अब्जने कमी झाली आहे. दुसरीकडे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती सोमवारी ८०६ दशलक्ष डॉलर्सने घसरली आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत २.३६ अब्ज डॉलरची घट झाली. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी १४ व्या, तर मुकेश अंबानी ११ व्या स्थानावर आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती २.९१ अब्ज डॉलर्सने वाढून २१८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Full Speech | दिंडोरीमध्ये शरद पवारांचं दमदार भाषण!

Today's Marathi News Live : PM मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा शरद पवार गटाचा कार्यकर्ता

Amol Kolhe Full Speech | 400 पार म्हणणारे तडीपार होणार, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Mamata Banerjee: 'इंडिया आघाडीचं केंद्रात सरकार आल्यास बाहेरून पाठिंबा देऊ...'; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची महत्वाची घोषणा

Maharashtra Local Bodies Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT