Iran vs Israel War Effect On India saam tv
बिझनेस

Iran vs Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे उडणार महागाईचा भडका; खते, घरातला किराणा महागणार

Iran vs Israel War Effect On India: होर्मुजची खाडी हा एक अत्यंत महत्त्वाचा आयात मार्ग आहे. जर इराणने हा मार्ग अडवला तर देशातील महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या दरावर पडणार आहे. या संघर्षामुळे भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. भारतासह इतर देशातील महागाई देखील वाढणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कच्चा तेलाच्या किमतींमध्ये ११ टक्क्यांची वाढ झालीय.

जर युद्धाचा भडका अधिक वाढला, तर कच्च्या तेलाचे दर 200 ते 300 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचतील, असा दावा इराकचे परराष्ट्र मंत्री फुआद हुसैन यांनी केलाय. जर तसे झाले तर त्याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरावर होईल. पेट्रोल 200 ते 230 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. देशातील मूलभूत वस्तूंपासून ते अन्नधान्यापर्यंतच्या गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे.

तेल दरवाढ आणि पुरवठा अडथळ्यांमुळे खालील वस्तू मोठ्या प्रमाणावर महाग होण्याची शक्यता आहे. इस्रायल-इराण संघर्षाचा आर्थिक तणाव जगभर जाणवू लागलाय. भारतात पेट्रोलसह अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही महागाई सामान्यांच्या खिशाला जबरदस्त फटका बसेल आणि भडका उडेल.

साबण, सर्फ, बिस्किटे, पेये, रंग, खाद्यतेल, काजू, फळे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू: मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही. औद्योगिक घटक: प्लास्टिक, रसायने, सॉल्ट्स, यंत्रसामग्री, पोलाद आणि दागिने यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनाही बसणार मोठा आर्थिक फटका

इस्रायल व इराणच्या संघर्षाचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने खते, डिझेल आणि पिकांसाठी लागणाऱ्या इतर उपकरणांच्या किमतीही झपाट्याने वाढतील. यामुळे पिकाचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल. अन्नधान्याचे दर वाढतील त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.

भारताच्या दृष्टीने होर्मुजची खाडी हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाद्वारे वस्तूंची आयात केली जाते. भारतात दोन तृतीयांशपेक्षा अधिक कच्चे तेल आणि एलएनजी गॅसची सुद्धा या मार्गातून आयात केली जाते. जर इराणने हा मार्ग अडवला, तर तेल पुरवठ्याच्या साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आयात मार्ग अडवल्याने देशात महागाई होण्याची दाट शक्यता आहे. वाहतुकीचे दर वाढल्यामुळे किराणा वस्तूंच्या विक्री दरातही वाढ होईल. किराणा वस्तूंच्या किमती देखील महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचा खर्च बिघडू शकतो. मंदावलेल्या आयात-निर्यातीमुळे इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे, गॅझेट्स महाग होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रागा; पर्यटकांचे हाल|VIDEO

Ghabadkund Movie: पुण्यात १२ हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्यदिव्य सेट; 'घबाडकुंड'चा थरार

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT