Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: बी.टेकनंतर बँकेत नोकरी, पुन्हा UPSC ची तयारी; IPS शांभवी मिश्रा यांचा प्रवास

Success Story of IPS Shambhavi Mishra: आयपीएस शांभवी मिश्रा यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

Siddhi Hande

आयपीएस शांभवी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

आयपीएस होण्याचे स्वप्न केले पूर्ण

इंजिनियरिंग केले, त्यानंतर केली यूपीएससी क्रॅक

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असंच काहीसं शांभवी मिश्रा यांनी केलं. त्यांनी इंजिनियरिंग केल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली आणि क्रॅकदेखील केली. शांभवी यांनी सुरुवातीला बँकेत नोकरी केली. त्याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

शांभवी यांचे शिक्षण

शांभवी या शाळेत खूप हुशार होत्या. त्यांना प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे होते. परंतु नाईलाजाने त्यांना सायन्स घ्यावे लागले. त्यांनी बीटेकमध्ये अॅडमिशन घेतले. बीटेकचा अभ्यास करत असतानाच तिसऱ्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आणि आपले लक्ष्य पूर्ण केले.

शांभवी यांनी २०१७ मध्ये बीटेक पूर्ण केले. नोकरी करताना त्यांना त्यांची पोस्टिंग ४२ किलोमीटर लांब झाली होती. रोज त्यांना प्रवासासाठी त्यांना ४ तासांचा वेळ लागायचा. या काळात त्या वर्तमानपत्र वाचायच्या. नोकरी करताना त्यांनी अभ्यासदेखील केला.

शांभवी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली. परंतु मुलाखतीत त्यांना अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही.

दोनदा यूपीएससी क्रॅक

२०१८ मध्ये शांभवी यांनी यूपीएससी परीक्षेत १९९ रँक प्राप्त केली. त्यांची आयपीएस पदावर निवड झाली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना दिले. २०१९ मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना ११६ रँक प्राप्त झाली. त्यानंतर त्यांना पुन्हा आयपीएस कॅडर मिळाले. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; खेडकर कुटुंबाचा चालकाला अटक, कुटुंबीय अद्याप फरार

Maharashtra Live News Update: - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी धरणे आंदोलन

Face Wash Tips: चेहरा सुंदर दिसण्यासाठी किती वेळा धुवावा?

Weight Loss Tips: पोटाच्या टायर्सनं हैराण झालात? घरचं जेवण करा अन् वजन घटवा; तज्ज्ञ सांगतात...

Shoking News: धक्कादायक! बळजबरी तरूणीच्या खोलीत घुसला, चाकूने भोसकलं अन् बलात्कार केला

SCROLL FOR NEXT